पोलिसांना यश ! तब्बल १९ दिवसांनी लागला अल्पवयीन मुलीचा ठावठिकाणा

पोलिसांनी पुणे येथून राम अंबादास काशिद या आरोपीसह या अल्पवयीन मुलीस ताब्यात घेतले.
Police
Police

आष्टी (जि.बीड) : शेतात कांदा लागवड करण्यासाठी गेल्यानंतर तेथून गायब झालेल्या अल्पवयीन मुलीचा ठावठिकाणी लावण्यास तब्बल 19 दिवसांनी अंभोरा पोलिसांना यश आले आहे.पोलिसांनी पुणे येथून राम अंबादास काशिद या आरोपीसह या अल्पवयीन मुलीस ताब्यात घेतले. तालुक्यातील एका खेडेगावातील 15 वर्षीय अल्पवयीन मुलगी कांदा लागवड काम करण्यासाठी तीन ऑक्टोबर रोजी (Beed) गावातील महिलांसमवेत शेतात गेली होती. कामावरून घरी परत न आल्याने तिचा नातेवाईकांनी परिसरात शोध घेतला. मात्र आढळून आली नाही. त्यामुळे मुलीच्या वडिलांनी पाच ऑक्टोबर रोजी मुलीला कामास घेऊन टोळीतील एक महिला व शेतात घेऊन (Crime In Beed) जाणाऱ्या चारचाकी वाहन चालकावर अपहरणाचा संशय व्यक्त करत अंभोरा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Police
तुमची पंधरा काम आणि माझं एकच काम,ते करा : अशोक चव्हाण

दरम्यान, मोबाईल ट्रेसिंगद्वारे संशयित आरोपी हा अल्पवयीन मुलीसह पुणे जिल्ह्यात असल्याचे अंभोरा पोलिसांना समजले. त्यावरून शुक्रवारी (ता.22) पुणे येथून संशयित आरोपीसह मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तब्बल 19 दिवसांनी मुलीचा ठावठिकाणा लावण्यात पोलिसांना यश प्राप्त झाले असून या प्रकरणी राम अंबादास काशिद (वय 27 वर्षे, रा. सांगवी पाटण) या आरोपीस अटक करण्यात आली आहे, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक रोहित बेंबरे यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com