Beed Crime|बीड बसस्थानकाजवळच तरुणाचा धारधार शस्त्राचे वार करुन खून

हल्ल्यानंतर तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडला होता.
murder
murdermurder

बीड : जिल्ह्यात दरोडे, चोऱ्या, बलात्कार, गुटखा माफियागरी, वाळूचोरी अशा घटनांनी कायदा व सुव्यवस्थेचे धिंदवडे उडविलेले असतानाच आता शहरात थरार उडवून देणारी घटना मंगळवारी (ता.१४) भरदुपारी मुख्य रस्त्यावर घडली. बसस्थाकाजवळील एका बँकेसमोर एका टोळक्याने तरुणावर धारदार शस्त्रांनी हल्ला (Crime In Beed) चढवत खुन केला. शेख शाहिद शेख सत्तार (वय २४, रा. बीड) असे खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे. बसस्थानकाच्या समोरच असलेल्या बँकेसमोर वर्दळीच्या ठिकाणी शेख शाहिद शेख सत्तार या तरुणावर तीन ते चार सशस्त्र हल्लेखोरांनी (Beed) धारदार शस्त्राचे सपासप वार केले.(Beed Crime Gang Killed Youth Near Bus Stand)

murder
Mhada|गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांना अटक करा : गुणरत्न सदावर्ते

हल्ल्यानंतर तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याला तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. हल्लेखोर कोण? हल्ल्यामागच्या कारणांचा शोध पोलिस घेत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com