beed crime
beed crime

Crime News: बीडमध्ये मुख्याधिकाऱ्यावर चाकू, लोखंडी रॉडने हल्ला

वडवणी (बीड): कार्यालयातील कामकाजावरून वाद झाल्याने नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांवर हल्ला झाला आहे. वडवणी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी प्रशांत पाटील आणि स्थापत्य अभियंता सुमितकुमार मेटे यांच्यात कामावरून वाद झाल्याने मेटेंच्या नातेवाईकांनी पाटील यांच्यावर चाकूने हल्ला केला आहे.

मु्ख्याधिकारी प्रशांत पाटील दररोजचे काम करून घरी जात असताना कार्यालय परिसरात मंगळवारी मेटे यांच्या नातेवाईकांनी अचानक जिवघेणा हल्ला केला. कारण किरकोळ असतानाही पाटील यांच्यावर चाकू, लोखंडी रॉडने जबर मारहाण केली आहे.

या हल्ल्यात मुख्याधिकारी पाटील यांच्या हाताला गंभीर जखम झाली असून मांडीवर आणि अंगाला मुकामारही लागला आहे. या हल्ल्यानंतर पाटील यांनी वडवणी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सर्व आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या मारहाणीबद्द्ल पाटील यांना विचारले असता, मनस्थिती ठिक नसल्याचे काहीही बोलण्यास नकार दिला.

(edited by- pramod sarawale)


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com