प्रियकराने लग्नास नकार दिल्याने परिचारिकेची आत्महत्या

शहरातील शिवाजी नगर भागातील रहिवासी असलेली सोनाली अंकुश जाधव (वय २६) ही तरुणी शहरातीलच एका खाजगी रुग्णालयात नर्स होती
beed crime.
beed crime.beed crime

बीड: खासगी रुग्णालयात नर्स असलेल्या तरुणीने प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. प्रियकराने लग्नास नकार दिल्याने तिने हे पाऊल उचलले. यावरुन प्रियकराविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून नेकनूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. अक्षय राजाभाऊ आव्हाड (वय २७, रा. डोईफोडवाडी, ता. बीड) असे गुन्हा नोंद झालेल्या प्रियकराचे नाव आहे.

शहरातील शिवाजी नगर भागातील रहिवासी असलेली सोनाली अंकुश जाधव (वय २६) ही तरुणी शहरातीलच एका खाजगी रुग्णालयात नर्स होती. सोनाली जाधवने सोमवारी (ता. २६) दुपारनंतर मांजरसुंबा घाटाच्या परिसरात एका झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. याप्रकरणी नेकनूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. दरम्यान पोलिस तपासातून त्या तरुणीने प्रेम प्रकरणातून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

beed crime.
Rolex Rings IPO: उद्या होणार रोलेक्स रिंग्जचा आयपीओ लाँच

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोनालीचे शहरातीलच एका खाजगी लॅबमधील अक्षय आव्हाडसोबत प्रेमसंबंध होते. दरम्यान सोनालीने अक्षयकडे लग्नासाठी हट्ट धरला होता. मात्र अक्षयने लग्नाला नकार दिल्याने सोनालीने नैराश्यातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची फिर्याद सोनालीचा भाऊ अजय जाधव याने दिली आहे. नेकनूर पोलिस ठाण्यात अक्षय आव्हाड विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा तपास फौजदार श्री. काळे करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com