राज्यात महाविकास आघाडीचा पहिला सरपंच बीड जिल्ह्यात

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 10 December 2019

सिरसाळा सरपंचपदाची पोटनिवडणूक महाविकास आघाडीच्या उमेदवार आश्रूबाई विश्वनाथ किरवले यांनी जिंकली असून, त्यांनी भाजप उमेदवाराचा तब्बल एक हजार 395 मतांनी पराभव केला.

सिरसाळा (जि. बीड) - राज्यात नव्याने स्थापन झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस व शिवसेना या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीने आपला पहिला विजय बीड जिल्ह्यातील परळी तालुक्‍यात नोंदवला आहे.

आमदार धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली सिरसाळा सरपंचपदाची पोटनिवडणूक महाविकास आघाडीच्या उमेदवार आश्रूबाई विश्वनाथ किरवले यांनी जिंकली असून, त्यांनी भाजप उमेदवाराचा तब्बल एक हजार 395 मतांनी पराभव केला. तालुक्‍यातील सर्वात मोठ्या असलेल्या या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी रविवारी पोटनिवडणूक झाली. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या वतीने आश्रूबाई किरवले या उभ्या होत्या.

Image may contain: 1 person, close-up
आश्रूबाई किरवले

महाविकास आघाडीचा पहिलाच प्रयोग या मतदारसंघात करताना तिन्ही पक्षांना एकत्रित करून एकच उमेदवार उभा केला. महाविकास आघाडीच्या आश्रूबाई किरवले यांना दोन हजार सातशे पाच मते, तर प्रतिस्पर्धी भाजप उमेदवार आशाबाई चोपडे यांना एक हजार तीनशे पाच मते पडली.

जाणून घ्या - पेशव्यांचा हा मुलगा का झाला मुस्लीम?

Image may contain: 9 people, people standing, crowd and outdoor

वंचित आघाडीच्या रुक्‍मीण किरवले यांना 762 तर अपक्ष उमेदवार इंदूबाई आरगडे यांना 113 मते मिळाली. मतमोजणीनंतर गावातून भव्य मिरवणूक काढून महाविकास आघाडीच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला. आमदार मुंडे यांनी नूतन सरपंच आश्रूबाई किरवले यांचे अभिनंदन केले. गावातील सुरळीत पाणीपुरवठा, प्रभागातील रस्ते, नाली, स्वच्छता यासह सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे रामराव किरवले यांनी जाहीर सभेत सांगितले. 

हेही वाचा - सेक्‍ससाठी तीन हजारांचा रेट; या शहरातील मॉल व्यवस्थापकासह एजंट, वारांगना अटकेत 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Beed district, the first sarpanch of the mahavikas aaghadi