रस्ते, पाण्यासाठी जिल्ह्याला १०० कोटी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 जून 2019

३७ रस्ताकामांसाठी तब्बल ९० कोटी रुपये, तर पाणीयोजनांसाठी १० कोटी असे १०० कोटी जिल्ह्याला मिळाले आहेत.

बीड - मुख्यमंत्री ग्रामसडक योजना व मुख्यमंत्री पेयजल योजनांमधून हाती घेतलेल्या नळयोजनांसाठी जिल्ह्याला भरीव निधी प्राप्त झाला आहे. ३७ रस्ताकामांसाठी तब्बल ९० कोटी रुपये, तर पाणीयोजनांसाठी १० कोटी असे १०० कोटी जिल्ह्याला मिळाले आहेत. ९० कोटी २१ लाख रुपयांच्या निधीतून ३७ गावांच्या १३२ किलोमीटर अंतराची कामे करण्यात येणार आहेत. तर १० कोटी रुपयांचा निधी हा मुख्यमंत्री पेयजल योजनांतून हाती घेतलेल्या नळयोजनांसाठी देण्यात येईल. 

पेयजल योजनांसाठी १० कोटी 
ग्रामीण भागात शुद्ध व पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याकरिता शासनाने मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना सुरू केली आहे. सदर निधीतून मंजुरी देण्यात आलेल्या नळपाणीपुरवठा योजनांच्या अंमलबजावणीसाठी बीड जिल्हा परिषदेला १० कोटी एक लाख ९२ हजार इतका निधी स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाने वितरित केला आहे. 

पंकजा मुंडेंचा पाठपुरावा 
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झालेले रस्ते हे पंकजा मुंडे यांच्या ग्रामविकास खात्यातूनच आहेत. तर, पाणीयोजनांना निधी भेटावा यासाठी त्यांनी पाठपुरावा केला होता. एकूणच दोन्ही बाबींसाठी १०० कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे.

या रस्त्यांची होणार कामे
 जिल्हा मार्ग ते बागझरी (६.७५ किमी)  जिल्हा मार्ग ते जयहनुमान तांडा (पाच किमी)  जिल्हा मार्ग ते उजनी ते खापरटोन  कुंभेफळ ते जानेगाव  होळ ते लाडेवडगाव  आरणवाडी ते माळी वस्ती  गोपाळपूर ते लमाण तांडा  राज्य मार्ग ते वाघोली

 गोपाळपूर ते लमाण तांडा  
 परभरणी तांडा  राज्य मार्ग ते जैतापूर  जिल्हा मार्ग ते देठेवाडी  राज्य मार्ग ते परभणी तांडा  चिंचाळा ते चिंचाळा  डोंगरवस्ती ते कर्दवाडी 
 राज्य मार्ग ते जायकेवाडी ते टकारवाडी  जिल्हा मार्ग ते हनुमाननगर तांडा  जिल्हा मार्ग ते वनमाल तांडा  आंतरवली ते मिरगाव-पांगुळगाव ते जिल्हा मार्ग  जिल्हा मार्ग ते ठाकूरवाडी तांडा  जिल्हा मार्ग ते काठोडा राज्य मार्ग ते जाधव वस्ती 
 राज्य मार्ग ते खांडेपारगाव ते अंथरवणप्रिंपी. राज्य मार्ग ते पाटोदा  लौळवस्ती ते तळेपिंपळगाव   नफरवाडी ते पाटील वस्ती ते येवलवाडी  राज्य मार्ग ते जवळा  जिल्हा मार्ग ते कंठाळवाडी  हुंडेवाडी ते नाकाडेवाडी  जिल्हा मार्ग ते कुटेवाडी 
 जिल्हा मार्ग ते रामनाईक तांडा ते निमगाव  जिल्हा मार्ग ते ते हाजीपूर सापतेवस्ती  राज्य मार्ग ते कारखेल बु. ते सांगवी पाटण  राज्य मार्ग ते वडगाव  जिल्हा मार्ग ते भवरवाडी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Beed district has 100 crores for roads and water