बीड : हनुमानगडाचे मठाधिपतींवर बलात्काराचा गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Beed Hanumangad abbot rape case

बीड : हनुमानगडाचे मठाधिपतींवर बलात्काराचा गुन्हा

बीड - पाटोदा तालुक्यातील अंमळनेरजवळील हनुमान गडाचे मठाधिपती बुवासाहेब जिजाभाऊ खाडे महाराज यांच्याविरुद्ध लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा गुन्हा नोंद झाला आहे. हा गुन्हा नोंद झाल्यावर महाराजांना ग्रामस्थांनी बेदम मारहाण केली. यात गंभीर जखमी महाराजांवर पुणे येथे उपचार सुरू आहेत. दरम्यान, मारहणा करून साडेतेरा लाख रुपये लुटल्याची तक्रार महाजारांनी यापूर्वी दिली होती. तसा गुन्हा नोंद झाला आहे. खर्डा (ता. जामखेड) पोलिस ठाण्यात दोन्ही गुन्हे नोंद आहेत.

जामखेड तालुक्यातील मोहरी गावातील घुगे वस्ती येथे महादेव मंदिराचे बांधकाम सुरू आहे. ते पाहण्यासाठी खाडे महाराज २९ जुलैला गेले होते. त्यावेळी बाजीराव गीते यांनी महाराजांना घरी येण्याचे निमंत्रण दिले. पहाटेच्या सुमारास बाजीराव गीते, भिवा गोपाळघरे, अरुण गीते, राहुल संपत गीते, रामा गीते यांनी मारहाण करून अंगावरील १३ लाख ६० हजार रुपयांचे दागिने लुटल्याची फिर्याद महाराजांनी खर्डा पोलिस ठाण्यात दिली.

महाराजांच्या फिर्यादीनुसार बुधवारी (ता. तीन) संशयितांविरुद्ध गुन्हा नोंद झाला. दुसऱ्याच दिवशी गावातील महिलेने महाराजांच्या विरोधात लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची फिर्याद दिली. बारा जुलैला बुवासाहेब खाडे महाराजांनी अत्याचार केल्याचे पीडितीने फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, या प्रकारानंतर महाराजांना ग्रामस्थांनी बेदम मारहाण केली. त्यात महाराज गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर पुणे येथे उपचार सुरू आहेत.

Web Title: Beed Hanumangad Abbot Rape Case

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..