बीडमध्ये भाजपची सत्तेला गवसणी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 मार्च 2017

बीड - जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपच्या सविता विजय गोल्हार, तर उपाध्यक्षपदी शिवसंग्रामच्या जयश्री राजेंद्र मस्के यांची निवड झाली. राष्ट्रवादीचे माजी मंत्री सुरेश धस यांनी भाजपला उघड मदत केली. शिवसंग्राम, शिवसेना व कॉंग्रेसला सोबत घेत भाजपने सत्तेला गवसणी घातली. 

भाजप युतीकडून अध्यक्षपदासाठी सविता गोल्हार, तर उपाध्यक्षपदासाठी शिवसंग्रामप्रणीत भारतीय संग्राम परिषदेच्या जयश्री राजेंद्र मस्के यांची उमेदवारी होती. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून अध्यक्षपदासाठी मंगला प्रकाश सोळंके, तर उपाध्यक्षपदासाठी शिवकन्या शिवाजीराव सिरसाट उमेदवार होत्या. श्रीमती गोल्हार व श्रीमती मस्के यांना प्रत्येकी 34, तर त्यांच्या विरोधातील श्रीमती सोळंके व श्रीमती शिरसाट यांना प्रत्येकी 25 मते पडली. राष्ट्रवादीचा एक सदस्य गैरहजर राहिला. 

राष्ट्रवादीकडे 60 पैकी सर्वाधिक 26, तर भाजपचे 20 सदस्य आहेत. राष्ट्रवादीचे माजी मंत्री सुरेश धस यांनी भाजपला उघड मदत केली. त्यांच्या पाच समर्थकांसह शिवसेना व शिवसंग्रामच्या प्रत्येकी चार व कॉंग्रेसच्या एका सदस्याने भाजप युतीला मतदान केले. राष्ट्रवादीच्या 21 सदस्यांसह काकू-नाना आघाडीचे तीन व कॉंग्रेसच्या दोन सदस्यांनी राष्ट्रवादी आघाडीला मतदान केले. राष्ट्रवादीचा एक सदस्य गैरहजर राहिला. दरम्यान, सुरेश धस व जयदत्त क्षीरसागर यांनी पक्षविरोधी भूमिका घेतल्याचा आरोप करीत त्यांची पक्षातून हाकालपट्टी करावी अन्यथा पक्ष सोडू, असा इशारा राष्ट्रवादीचे माजी मंत्री प्रकाश सोळंके यांनी केला. 

Web Title: Beed hit BJP in power