होळी, धुलिवंदन सण अडकला लाॅकडाउनमध्ये; बंजारा समाज करतो वेगळेपणाने साजरा

02Sakal_20News
02Sakal_20News

माजलगाव (जि. बीड) : हिंदु संस्कृतीमध्ये होळी, धुलिवंदन सण उत्साहात साजरे केले जातात तर बंजारा समाजामध्ये या सणला अनन्यसाधारण असे महत्व आहे. एक महिण्यापासून या सणाची तयारी बंजारा समाजातील महिला, पुरूष करतात. शहरी भागासह ग्रामीण भागात होळी, धुलिवंदन सणाला एक वेगळे महत्व आहे. धुलिवंदन साजरा करण्याकरीता बंजारा समाजामध्ये एक वेगळी परंपरा आहे. शेकडो वर्षांपासून ही परंपरा आजतागायत सुरूच आहे. या सणाला नातेवाईक व मित्रपरिवार एकत्र येउन आनंदाने हा सण साजरा करतात. परंतु यावर्षी कोरोनामुळे लाॅकडाउन पडल्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला आहे.

बंजारा समाजामध्ये या होलिकोत्सवाकरीता महिला, बंजारा, लेंगी असे वेगवेगळे गित सादर करतात. गाण्यामधुन परंपरा चालत आलेल्या रितीरिवाजाची जपवणूक करण्याबरोबरच सामाजिक सलोखा ठेवण्याचा संदेश दिला जातो. परंतू यावर्षी कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे दहा दिवसांचे लाॅकडाउन पडले आहे. परिणामी या सणाकरीता येणारे नातेवाईक व मित्रपरिवार एकत्र येउ शकले नसल्याने अत्यंत साध्या पध्दतीने हा सण साजरा करावा लागणार आहे.


रंग खरेदीसाठी अडचण
कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने दहा दिवसांची टाळेबंदी घोषित केली आहे. उद्याच होळी तर परवा धूलिवंदनाचा सण आहे. परंतु टाळेबंदी असल्यामुळे रंग खरेदीसाठी दुकाने बंद आहेत. त्यामुळे रंग खरेदाठी मात्र अडचण होणार आहे.

असा करतात होळी, धूलिवंदनाचा सण
बंजारा समाजामध्ये मागील आठ दिवसांपासून होळी, धूलिवंदनाचा सण साजरा करण्यात येतो. रविवारी (ता. 28) पहाटे चार वाजता होळी पेटवितात. धूलिवंदनाच्या दिवशी सोमवारी (ता. 29) दिवसभर गाणे म्हणत सण साजरा करण्यात येतो आणि रात्री पून्हा संध्याकाळी आठ वाजता होळी पेटविण्यात येते व त्याठिकाणी लहान मुलांसह अबालवृध्द दर्शन घेतात. हा उत्सव रंगपंचमी पर्यंत साजरा करण्यात येतो.

बंजारा, लेंगी गित करतात साजरे
राम खेल होळी....लक्ष्मण दांडो काढो रे...
जुनी वखेडीची...खोज काढो रामजी...
राजा दशरथ के चार बेटे होय रे...
चारीरे बिचम जळरं होळी...
राम खेलो..होळी रं...
भाई - भाई होळी खेलो रे..

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताच असल्याने शासनाने दहा दिवसांची टाळेबंदी केली आहे. रविवारी आणि सोमवारी होळी व धूलिवंदनाचा सण आहे. सणासाठी येणारे नातेवाईक मात्र टाळेबंदीमुळे घरातच कैद आहेत. शासनाने घातलेल्या नियमांचे पालन करत अत्यंत साधेपणाने घरच्या घरी होळी साजरी करण्यात येणार आहे. - मुद्रिका संतोष पवार, महिला.

वर्षातला सर्वात मोठा सण म्हणुन होळी, धूलिवंदनाच्या सणाकडे पाहिले जाते. बंजारा समाजात धूलिवंदनाच्या सणाला वेगळे महत्व आहे. पहिल्यांदाच या सणाला लाॅकडाउन झाल्यामुळे हिरमोड झाला आहे. कुटूंबासमवेत घरीच होळी साजरी करणार आहे. - कल्पना प्रकाश पवार, महिला.
 

 

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com