स्वच्छतागृहांसाठी महिला दिनी 'निषेध महाआरती'; जागतिक महिला दिनी अनोखं आंदोलन

beed
beed

बीड: शहरातील नगररोडवरील शासकीय कार्यालयासमोर केवळ पुरूषांसाठीच स्वच्छतागृह बांधण्यात आली आहे. इतर भागातही तीच परिस्थिती असल्याने महिलांची कुचंबना होते. वरिष्ठांनी आदेश देऊनही पालिकेने स्वच्छतागृहांची उभारणी केली नसल्याचा आरोप करत याच्या निषेधार्थ सोमवारी (ता. आठ) जागतिक महिला दिनी महाआरती आंदोलन करण्यात आले.

शहरात महिला स्वच्छतागृहांचा अभाव आहे. प्रमुख बाजारापेठांसह प्रमुख रस्त्यांवर महिलांसाठी स्वच्छतागृहे नसल्याने महिलांची कुचंबना होत आहे. नगररोडवरील चंपावती शाळा, पंचायत समिती कार्यालय, न्यायालयासमोर, छत्रपती शिवाजीमहाराज पुतळ्याशेजारी, बसस्थानकाच्या मागील बाजुस जाणाऱ्या रोडवर नगरपालिकेने स्वच्छतागृहे उभारली असली तरी ती केवळ पुरुषांसाठी आहेत.

स्वच्छतागृहांचे बांधकामही सदोष आहे. पालिकेने अनेक वेळा महिलांसाठी स्वच्छतागृहे बांधण्याची केवळ घोषणा केली मात्र अंमलबजावणी शुन्य आहे. याच्या निषेधार्थ सोमवारी (ता. आठ) सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध महाआरती आंदोलन करण्यात आले. त्यानंतर स्वच्छतागृह बांधकामे करावीत, या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांना देण्यात आले. यावेळी शेख युनुस, महंमद जुबेरखान उपस्थित होते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com