बीड-लातूरचा आज निकाल; मुंडेंची प्रतिष्ठा पणाला 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 जून 2018

या निवडणुकीत भाजपचे सुरेश धस विरुद्ध राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत अशोक जगदाळे यांच्यात लढत झाली. 
 

मुंबई : विधान परिषदेसाठी बीड-लातूर-उस्मानाबाद स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघात झालेल्या निवडणुकीचा निकाल आज (मंगळवार) लागणार आहे.

या संदर्भात राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्‍तांना सूचना दिल्या. या निकालासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठांध्ये विविध अपील दाखल करण्यात आले होते. या अपिलांवरील सुनावणी सोमवारी सकाळी झाली. ज्यात सर्व अपील फेटाळली गेली असून, त्वरित निकाल लावावा, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. 

या निवडणुकीत भाजपचे सुरेश धस विरुद्ध राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत अशोक जगदाळे यांच्यात लढत झाली. 
 

Web Title: Beed Latur legislative council election result