मुंडे नसते तर मेंढरं राखत बसलाे असताे : जानकर

गोपीनाथ मुंडे नसते तर हा महादेव जानकर मेंढरं राखत बसला असता. दुसऱ्या जातीचा एखादा आमदार ऊस तोडायला गेला असता.
MLA Mahadev Jankar
MLA Mahadev Jankaresakal

पाटोदा : भगवानबाबा एकट्या वंजाऱ्यांचे नव्हते, ब्राह्मणांचेही नव्हते आणि मुस्लिमांचेही नव्हते. भगवानबाबा सर्वांचेच होते. भगवान बाबांना जात नव्हती. गोपीनाथ मुंडेंनाही जात नव्हती. गोपीनाथ मुंडे नसते तर हा महादेव जानकर मेंढरं राखत बसला असता. दुसऱ्या जातीचा एखादा आमदार ऊस तोडायला गेला असता. पण ऊस तोडणाऱ्या माणसासाच्या हातात कोयता देण्याऐवजी त्याला आयपीएस, फौजदार करण्याचं क्रेडीट दिवंगत गोपीनाथराव मुंडेंना असल्याचे प्रतिपादन महादेव जानकर यांनी केले.

पंकजा मुंडेंच्या पाठीशी खंबीर राहण्याचे आवाहनही त्यांनी मेळाव्यात केल. डॉ. प्रीतम मुंडे म्हणाल्या, नवरात्रीचा सण देवीचा सण म्हणून साजरा करतो. देवीचं सोज्वळ, मायाळू, सहनशील रुप आपण बघतो. पंकजा मुंडे पालकमंत्री असताना हे मायाळू, सोज्वळ आणि सहनशील रुप पाहिले. तर जेव्हा समाजात अराजकता पसरते, विषमता-अन्याय पसरतो तेव्हा तिचं देवी दुर्गेचा अवतार घेऊन त्या अन्यायाला संपविल्याशिवाय राहत नाही.

MLA Mahadev Jankar
Video : धोनीची चूक जड्डूनं भरुन काढली; मॅच इथंच फिरली!

मुंडे परिवार म्हणजे फक्त पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे नाही. तर इथे आज आलेला प्रत्येकजण, दिवंगत मुंडे यांच्या आशीर्वादाने मंचावर उपस्थित असलेले सर्वजण परिवाराचा भाग आहेत. मेळावा कोणत्याही पक्षाचा किंवा राजकीय नसून वंचित माणसांचा असल्याचेही प्रीतम मुंडे म्हणाल्या.

मुंडेंच्या फेरीचे जागोजागी जंगी स्वागत

मेळाव्यानिमित्त खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी गोपीनाथगड (पांगरी) ते भगवान भक्तीगड अशी फेरी काढली. फेरीचे जागोजागी जंगी स्वागत करण्यात आले. अनेक ठिकाणी फुलांची उधळण झाली तर काही ठिकाणी महिलांनी त्यांचे औक्षण केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com