Beed माजलगावचे आमदार सोळंकेंसह पत्नीवर गुन्हा दाखल Beed Majalgaon MLA Solanke wife - BJP worker attack case | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आमदार प्रकाश सोळंके

Beed News : माजलगावचे आमदार सोळंकेंसह पत्नीवर गुन्हा दाखल

माजलगाव : येथील भाजपा कार्यकर्ते अशोक शेजुळ यांचेवर मंगळवारी ता. 8 बुधवारी हल्ला झाल्याची घटना घडली होती. शेजुळ यांनी राष्ट्ववादीचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या विवीध संस्थानमधील अनियमिततेबाबत तक्रारी केल्या होत्या.

यातुनच हल्ला झाल्याचा आरोप करत आमदार प्रकाश सोळंके, मंगला सोळंके यांचेसह उद्योजक रामेश्वर टवाणी यांचेवर शहर पोलिसात बुधवारी ता. 8 अशोक शेजुळ यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडुन मिळालेली माहिती अशी की, भाजपा कार्यकर्ते अशोक शेजुळ यांनी सुंदरराव सोळंके टेक्सटाईल पार्क, माजलगाव सहकारी साखर कारखाण्याची माहिती अधिकाराअंतर्गत माहिती मागितली होती. या पार्श्वभुमीवर त्यांनी संभाजीनगर हायकोर्टात याचिका दाखल केली

होती. दरम्यान मंगळवारी धुलीवंदन दिनी शेजुळ यांचेवर अज्ञात चार ते पाच जणांनी हल्ला करत तू लय प्रकाश सोळंकेंच्या तक्रारी करतो का ? असे म्हणत लोखंडी रॉडने मारहाण करत गंभिर जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

या हल्यात शेजुळ यांच्या दोन्ही पायांना, दोन्ही हातांना, कंबरेत दुखापत झाली आहे. याप्रकरणी श्री. शेजुळ यांच्या फिर्यादीवरून आमदार प्रकाश सोळंके, त्यांच्या पत्नी मंगला सोळंके, टेक्स्टाईल पार्कचे अध्यक्ष रामेश्वर टवाणी यांचे सह पाच ते सहा जणांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांनी दिली असुन या प्रकरणाचा तपास ते करत आहेत.