बीड : पाच वर्षांत ७५ शेतकऱ्यांनी कवटाळले मृत्यूला

माजलगाव : नापिकी, आर्थिक विवंचना आत्महत्येचे कारण
Beed marathwada farmers suicide
Beed marathwada farmers suicidesakal

माजलगाव : तालुक्यात मागील पाच वर्षांत जवळपास ७५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून चालु वर्षात देखील जानेवारी महिन्यापासूनची आकडेवारी पाहिली तर जवळपास पाच शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. नापिकी आणि आर्थिक विवंचनेतून या शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत.

शहराजवळ असलेल्या माजलगाव धरणामुळे तालुक्याच्या सिंचन क्षेत्रात मोठी वाढ होऊन ६५ टक्क्यांपेक्षा अधिकचे सिंचनक्षेत्र झाले आहे. धरणाच्या पाण्यावर तालुक्यात होत असलेली उसाची लागवड यामुळे तालुक्याला ग्रीनबेल्ट तालुका ही नवीन ओळख मिळालेली आहे. मागील तीन वर्षांपासून सतत धरण भरत असल्यामुळे बहुतांशी युवा शेतकरी फळबाग लागवडीकडे वळाला असून आंबा, चिकू, पपई, डाळिंब, जांभुळ, केळी या फळबागांनंतर आता नव्याने शेतकऱ्यांनी सफरचंद व ड्रॅगन फ्रुटची लागवड यशस्वी करून दाखविली आहे. त्यामुळे येथील शेतकरी व माजलगाव तालुका हा सधन तालुका म्हणून देखील ओळखला जातो. अशा परिस्थितीत मागील पाच वर्षांत सुमारे ७५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. एवढेच काय यावर्षी जानेवारी महिन्यापासून ते आजपर्यंत पाच शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे.

पाच वर्षांतील आत्महत्या

वर्ष - २०१७ आत्महत्या - १६

वर्ष - २०१८ आत्महत्या - १८

वर्ष - २०१९ आत्महत्या - १३

वर्ष - २०२० आत्महत्या - १२

वर्ष - २०२१ आत्महत्या - ११

वर्ष - २०२२ आत्महत्या - ०५

शेतकऱ्यांनी संयम ठेऊन शेतीचे योग्य व्यवस्थापन करावे. कृषी विभागाचा सल्ल्याने शेती केली पाहिजे. आत्महत्या हा शेवटचा पर्याय नाही.

- वर्षा मनाळे,तहसीलदार, माजलगाव

शासनाचा नाकर्तेपणा, शेतीमालाच्या दरवाढीकडे लोकप्रतिनिधींचे असलेले दुर्लक्ष, अतिरिक्त उसाचा प्रश्न यातून शेतकऱ्यांची होत असलेली आर्थिक पिळवणूक यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. शेतकऱ्यांनी खंबीरपणे परिस्थितीचा सामना करावा.

- गंगाभिषण थावरे,अध्यक्ष, शेतकरी संघर्ष समिती माजलगाव.

शेतकरी आत्महत्येस शासन जबाबदार आहे. शासनाने शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू कराव्यात. कोणत्याही शासनाला शेतकरी आत्महत्येचे देणेघेणं नाही. निवडणुकीच्या वेळी फक्त शेतकरी दिसतो. शेतकऱ्यांसाठी मात्र कोणतेच शासन कुठल्याही उपाययोजना करत नाही.

- अॅड. नारायण गोले, कार्यकर्ते, शेतकरी कामगार पक्ष.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com