वादळी पावसामुळे पिकांचे नुकसान

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 ऑक्टोबर 2017

बीड - हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार शनिवारी (ता. ७) दुपारी जिल्ह्यातील काही भागांत वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या वेळी विजांचा प्रचंड कडकडाट झाल्याने धारूर तालुक्‍यात पाच, तर माजलगाव तालुक्‍यात एक असे जिल्ह्यात एकूण ६ जणांचा वीज अंगावर पडल्याने मृत्यू झाला. याशिवाय अंबाजोगाई तालुक्‍यात दोन जनावरे दगावल्याची घटनाही घडली. एकीकडे विजांच्या कडकडाटामुळे जीवितहानी झालेली असतानाच दुसरीकडे या वेळी सोसाट्याचा वारा सुटल्याने अनेक ठिकाणी उसाचे पीक आडवे झाले आहे. काही ठिकाणी कपाशीची झाडेही आडवी झाली असून मोसंबी फळबागांचेही मोठे नुकसान झाले आहे.

बीड - हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार शनिवारी (ता. ७) दुपारी जिल्ह्यातील काही भागांत वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या वेळी विजांचा प्रचंड कडकडाट झाल्याने धारूर तालुक्‍यात पाच, तर माजलगाव तालुक्‍यात एक असे जिल्ह्यात एकूण ६ जणांचा वीज अंगावर पडल्याने मृत्यू झाला. याशिवाय अंबाजोगाई तालुक्‍यात दोन जनावरे दगावल्याची घटनाही घडली. एकीकडे विजांच्या कडकडाटामुळे जीवितहानी झालेली असतानाच दुसरीकडे या वेळी सोसाट्याचा वारा सुटल्याने अनेक ठिकाणी उसाचे पीक आडवे झाले आहे. काही ठिकाणी कपाशीची झाडेही आडवी झाली असून मोसंबी फळबागांचेही मोठे नुकसान झाले आहे. वाऱ्यामुळे मोसंबी पडल्याचे दृश्‍य फळबागांमध्ये दिसून येत आहे. एकंदरित परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.

जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला होता. जिल्ह्यात अतिवृष्टी तर झाली नाही; मात्र शनिवारी दुपारी वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात काही ठिकाणी पाऊस झाला. वीज अंगावर पडल्याने जिल्ह्यात शनिवारी सहा जणांचा मृत्यू झाला. याशिवाय दोन जनावरेही दगावली. दुसरीकडे अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे उंच वाढलेला ऊस अक्षरशः भुईसपाट झाला. येत्या महिना अथवा दोन महिन्यांत कारखान्याला जाणारा ऊस कारखान्याला जाण्यापूर्वीच वाऱ्यामुळे आडवा झाल्याने ऊस उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. उसाशिवाय जिल्ह्यात साडेतीन लाख हेक्‍टरवर लावण्यात आलेल्या व खरिपातील प्रमुख नगदी पीक म्हणून ओळख असलेल्या कपाशीची झाडेही या वादळाच्या तडाख्यातून सुटली नाहीत.

नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी
जिल्ह्यात शनिवारी झालेल्या पावसापूर्वी सोसाट्याचा वारा सुटल्याने ऊस, कापूस, सोयाबीन आदी खरीप पिकांसह मोसंबी फळबागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ऐन हातातोंडाशी आलेली पिके काढणीपूर्वीच भुईसपाट झाल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. त्यामुळे महसूल प्रशासनाने नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करावेत व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसाई भरपाई मिळवून देण्यासाठी शासनाला तसा अहवाल पाठवावा, अशी मागणी शेतकरी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष कालिदास आपेट यांनी केली आहे.

Web Title: beed marathwada news agriculture loss by storm rain