बीडमध्ये लाच घेताना जिल्हा पुरवठा अधिकारी अटकेत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 मार्च 2018

बीड - कारकुनामार्फत एक लाख 15 हजार रुपयांची लाच घेताना जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. नरहरी शेळके व जिल्हा लेखा परिवेक्षक बब्रुवाहन फड या दोघांना गुरुवारी (ता. 22) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. शासकीय विश्रामगृहाच्या बाजूला ही कारवाई करण्यात आली.

शहरातील सावित्रीबाई फुले महिला बचत गटाच्या स्वस्त धान्य दुकानाची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीची जिल्हा पुरवठा अधिकारी नरहरी शेळके यांनी चौकशी करून परवाना निलंबित केला. या तक्रारीचा राग मनात धरून संबंधित दुकानाच्या परवानाधारक महिलेने तक्रारदाराबाबतच पुन्हा जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याकडे तक्रार दिली. त्यावरून जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी संबंधिताला गुन्हा दाखल करण्याची नोटीस बजावली. याची सुनावणी जिल्हा पुरवठा अधिकारी नरहरी शेळके यांच्यासमोर सुरू होती. सुनावणीचा निकाल बाजूने देण्यासाठी नरहरी शेळके व जिल्हा लेखा परिवेक्षक बब्रुवाहन फड यांनी दोन लाख रुपयांची मागणी केली. त्यावरून संबंधिताने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. याची खातरजमा केली असता, दोन लाख रुपयांची लाच मागून गुरुवारी एक लाख 15 हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले.

Web Title: beed marathwada news district supply officer arrested crime