अपहृत मानेंची अखेर सुटका

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 जून 2017

आर्थिक व्यवहारातून अपहरण, दोघे अटकेत
बीड - लिंबागणेश गणातील शिवसंग्रामचे पंचायत समिती सदस्य बबन माने यांचे अपहरण आर्थिक व्यवहारातून झाल्याचे उघड झाले. अपहरणाची सुपारी देणारा पंचायत समितीचा माजी सदस्य बी. एस. कदम याच्यासह अपहरण करणाऱ्यांपैकी एकास अटक करण्यात आली.

पाटोदा पोलिसांनी दुचाकीवरून जीपचा 14 किलोमीटर पाठलाग करून जामखेड तालुक्‍यातील डिघोळ येथून माने यांची सोमवारी मध्यरात्री सुटका केली.

बबन माने नेहमीप्रमाणे सोमवारी सायंकाळी पालवण चौक परिसरात फिरायला गेले. या वेळी पांढऱ्या रंगाच्या जीपमधून आलेल्या चौघांनी त्यांना मारहाण करून त्यांचे अपहरण केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन वर्षांपूर्वी बबन माने व बी. एस. कदम (रा. येळंबघाट) या दोघांनी जनावरांसाठी छावणी चालविली. यातील व्यवहारातील कदम याची काही रक्कम बबन माने यांच्याकडून येणे बाकी होती. पैसे मिळत नसल्याने कदम याने महादेव दहिफळे यास अपहरणाची सुपारी दिल्याचे चौकशीतून समोर आले. गुन्हे शाखेने कदम यास रात्रीच येळंबघाट येथे ताब्यात घेतले, तर अपहरण करणाऱ्यांपैकी महादेव दहिफळे यास पोलिसांनी ताब्यात घेतले. पिंटू मुसळे, नितीन चाटे, रामा घुले हे तिघे फरारी आहेत.

Web Title: beed marathwada news kidnapped baban mane release