कर्जमाफीचे ४७८ कोटी जमा - पंकजा मुंडे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जानेवारी 2018

बीड - शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून एक लाख ४० हजार ३६ पात्र शेतकऱ्यांसाठी ५४५ कोटी २९ लाख रुपये प्राप्त झाले आहेत. यातील एक लाख १३ हजार ६६४ शेतकऱ्यांना ४७८ कोटी ५६ लाख रुपये त्यांच्या खात्यात जमा केल्याची माहिती पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.

बीड - शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून एक लाख ४० हजार ३६ पात्र शेतकऱ्यांसाठी ५४५ कोटी २९ लाख रुपये प्राप्त झाले आहेत. यातील एक लाख १३ हजार ६६४ शेतकऱ्यांना ४७८ कोटी ५६ लाख रुपये त्यांच्या खात्यात जमा केल्याची माहिती पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.

प्रजासत्ताक दिनाच्या ६८ व्या वर्धापनदिनानिमित्त शुक्रवारी (ता. २६) पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत ध्वजवंदनाचा मुख्य समांरभ येथील जिल्हा पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर झाला. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सविता गोल्हार, नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर, जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी धनराज नीला, पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, निवासी जिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, माजी आमदार उषा दराडे, आदिनाथ नवले उपस्थित होते. 

श्रीमती मुंडे म्हणाल्या, ‘एमसीएच’ विंग १०० खाटा व अतिरिक्त २०० खाटा अशा एकूण ३०० खाटांच्या बांधकामासाठी आवश्‍यक असलेली जागा व रुग्णालय बांधकामाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. 

अहमदनगर-परळी-बीड रेल्वेमार्गाचे १२९०.२९ हेक्‍टर क्षेत्राचे भूसंपादन पूर्ण झाले आहे. २०१९ पर्यंत रेल्वे सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यात एकूण आठ राष्ट्रीय महामार्ग मंजूर झाले आहेत. जिल्ह्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून ४५० गावांतील रस्ते मार्च २०१९ पर्यंत पूर्ण करण्याचा संकल्प असल्याचे श्रीमती मुंडे यांनी सांगितले.

या वेळी पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ नागरिकांची भेट घेऊन संवाद साधला आणि शुभेच्छा दिल्या. विविध विभागांतील उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कार पंकजा मुंडे यांच्या हस्ते झाला. या वेळी पोलिस दलाच्या प्लाटूनसह विविध विभाग, शाळा आणि महाविद्यालयांचे परेड संचलन झाले. शाळा व महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांतून कलागुणांचे सादरीकरण करून लक्ष वेधले. 

ॲड. संगीता धसे, अनिल शेळके व अभिमन्यू औताडे यांनी सूत्रसंचालन केले. 

अभिमन्यू औताडे यांचा गौरव
स्थानिक गुन्हे शाखेतील जमादार अभिमन्यू औताडे यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत त्यांचा शुक्रवारी (ता. २६) पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे उपस्थित होते.

Web Title: beed marathwada news loanwaiver 478 crore deposit