उसनवारीच्या चारशे रुपयांसाठी आंतरवालीत वृद्धाचा खून

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 जुलै 2017

गेवराई - उसनवारीवर घेतलेले चारशे रुपये पैसे मागितल्याच्या कारणावरुन एका ६५ वर्षीय वृध्दाचा डोक्‍यात काठ्यांनी मारहाण करत भावकीतीलच चौघांनी खून केल्याची घटना तालुक्‍यातील आंतरवाली येथे शनिवारी (ता. १५) उशिरा घडली. याप्रकरणी तलवाडा पोलिस ठाण्यात चार जणांविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून हे सर्वजण फरार झाले आहेत.

गेवराई तालुक्‍यातील आंतरवाली येथील लहू मारुती उमाप (वय ६५ वर्षे) असे मृत झालेल्या वृद्धाचे नाव आहे. लहू उमाप यांच्या मुलाचे भावकीतीलच मधुकर महादेव उमाप यांच्याकडे उसनवारी दिलेले चारशे रुपये होते. ते घरी येऊन का मागितले, याचा राग मनात धरुन सदाशिव महादेव उमाप, यादव महादेव उमाप, महादेव हिरामन उमाप या चौघांनी लहू उमाप यांच्या घरी जाऊन हुज्जत घातली.

यावेळी उमाप व संबंधित चौघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. त्यानंतर चौघांनीही उमाप यांना लाथाबुक्‍क्‍यांनी तसेच डोक्‍यात काठ्यांनी बेदम मारहाण केली. दरम्यान उमाप कुटुंबीयांनी सोडविण्याचा प्रयत्न करेपर्यंत मारहाण करुन सर्वजण निघून गेले. यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले लहू उमाप यांना गेवराई येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता प्राथमिक उपचारानंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. मृताचा मुलगा करण लहू उमाप याच्या तक्रारीवरुन तलवाडा पोलिस ठाण्यात मधुकर महादेव उमाप, सदाशिव महादेव उमाप, यादव महादेव उमाप, महादेव हिरामन उमाप या चौघांविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: beed marathwada news old man murder by for 400 rupees

टॅग्स