पालिकेवरचा उर्दू फलक शिवसेनेने फाडून टाकला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 ऑगस्ट 2017

बीड - पालिकेवर एमआयएम व काकू- नाना आघाडीच्या पुढाकाराने मंगळवारी लावलेला उर्दू भाषेतील फलक गुरुवारी शिवसेनेने फाडून टाकला. यानंतर तणाव निर्माण झाल्याने मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान, फलक काढून टाकण्याऐवजी नगरसेवक निवडून आणा, असा टोला एमआयएमने शिवसेनेला लगावला.

काकू- नाना आघाडी व एमआयएमच्या पुढाकाराने पालिकेवर लावलेल्या उर्दू फलकावरून शिवसैनिक आक्रमक झाले होते. गुरुवारी जिल्हाप्रमुख अनिल जगताप, किशोर जगताप, किसान सेनेचे जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी पालिकेत जाऊन मुख्याधिकारी धनंजय जावळीकर यांच्याकडे उर्दू फलक हटविण्याची मागणी केली. शिष्टमंडळ बाहेर पडत असतानाच शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी दुसऱ्या मजल्यावर जाऊन उर्दू फलक काढून फेकला व टेबल, काचेची; तसेच बंद पडलेल्या विद्युत साहित्याची तोडफोड केली. याची माहिती मिळताच पोलिसांची मोठी कुमक येथे तैनात करण्यात आली. दरम्यान, सीसीटीव्हीतील फुटेज तपासून याबाबत फिर्याद देणार असल्याचे मुख्याधिकारी धनंजय जावळीकर यांनी सांगितले.

Web Title: beed marathwada news urdu board tear by shivsena