तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 नोव्हेंबर 2017

बीड - तरुण शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (ता. 3) बीड तालुक्‍यातील उमरद जहांगीर येथे घडली. कृष्णा श्रीहरी तकीक (वय 30) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

बीड - तरुण शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (ता. 3) बीड तालुक्‍यातील उमरद जहांगीर येथे घडली. कृष्णा श्रीहरी तकीक (वय 30) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

कृष्णा यास एक एकर शेती असून, त्याच्या वडिलांचे निधन झालेले आहे. शेतीत भागत नसल्याने त्याने खासगी सावकाराकडून कर्ज घेऊन रिक्षा खरेदी केली. मात्र, त्यातूनही अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. कृष्णा नेहमी कर्ज फेडण्याच्या चिंतेत असत. दरम्यान, गुरुवारी जेवणानंतर घराबाहेर पडल्यानंतर तो परतला नाही. सकाळी एका झाडाला गळफास घेतल्याचे कुटुंबीयांच्या निदर्शनास आले.

Web Title: beed marathwada news young farmer suicide