छाननीचा घोळ अन्‌ अफवांचे पीक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 नोव्हेंबर 2016

बीड - नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी दाखल अर्जांची बुधवारी त्या-त्या ठिकाणच्या तहसील कार्यालयात छाननी झाली; मात्र उशिरापर्यंत छाननीचा घोळ सुरूच होता. बीडमध्ये वैध-अवैध अर्जांवरून गोंधळ आणि अफवा पसरत होत्या. दरम्यान, राष्ट्रवादीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या उमेदवारी अर्जावर शिवसंग्रामने आक्षेप नोंदविला असून त्याची उशिरा सुनावणी होणार आहे. तर याच पक्षाचे मोईन मास्टर आणि कॉंग्रेसच्या सुनीता अशोक हिंगे यांचे अर्ज अवैध ठरले आहेत.

बीड पालिकेच्या पन्नास जागांसाठी 739 इच्छुकांनी अर्ज दाखल केले होते. तर नगराध्यक्षपदासाठी 36 उमेदवारांनी 56 अर्ज दाखल केले होते. छाननीनंतर नगराध्यक्षपदासाठी 23 अर्ज बाद ठरले, तर 33 अर्ज वैध ठरले. मात्र, नगरसेवकांच्या अर्जांची उशिरापर्यंत छाननी सुरूच होती.

राष्ट्रवादीकडून नगराध्यक्षपदासाठी जिल्हाध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर व त्यांच्या पत्नी डॉ. दीपा क्षीरसागर यांचे उमेदवारी अर्ज होते. डॉ. क्षीरसागर यांचा अर्ज वैध ठरल्याने दुसऱ्या पक्षाच्या अधिकृत उमेदवारीच्या
एबी फॉर्मवर दुसऱ्या पसंतीच्या डॉ. दीपा क्षीरसागर यांचा अर्ज रद्द झाला. दरम्यान, बीड पालिकेत एकूण 25 प्रभाग असून रात्री उशिरापर्यंत केवळ 16 प्रभागांतील अर्जांची छाननी झाली होती.

स्वाक्षरी नसल्याने अर्ज अवैध
कॉंग्रेसच्या सुनीता अशोक हिंगे व राष्ट्रवादीचे मोईन मास्टर यांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले. अर्जाच्या शपथपत्रांवर स्वाक्षरी नसल्याने त्यांचे अर्ज अवैध ठरले आहेत.

डॉ. क्षीरसागरांच्या उमेदवारीवर शिवसंग्रामचा आक्षेप
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीवर शिवसंग्रामचे राहुल मस्के यांनी आक्षेप नोंदवला. त्यांचे राहते घर अतिक्रमणामध्ये येत असल्याची तक्रार शिवसंग्रामने केली आहे. या अक्षेपावर छाननी पूर्ण झाल्यानंतर सुनावणी होणार आहे.

एबी फॉर्मच्या गठ्ठ्यांमुळे गोंधळ
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने बीडमध्ये कॉंग्रेसला 50 पैकी तीन जागा देत पक्षाचे 47 उमेदवारी अर्ज दाखल केले; मात्र उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी 27 उमेदवारांच्या अर्जांसोबत पक्षाचे एबी फॉर्म दिले.

Web Title: beed municipal election