बीडमध्ये सर्वच सभापती डॉ. क्षीरसागर गटाचे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जानेवारी 2018

एमआयएम, शिवसेना, भाजपचीही साथ

बीड : बीड नगर पालिकेच्या विषय समिती निवडीत आज (सोमवार) नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी पुतण्याच्या सत्तेला हादरा देत सर्व सभापतीपदे आपल्या गटाला मिळविली. एमआयएम (स्वतंत्र गट), शिवसेना व भाजपची साथ मिळविण्यातही त्यांना यश आले.

एमआयएम, शिवसेना, भाजपचीही साथ

बीड : बीड नगर पालिकेच्या विषय समिती निवडीत आज (सोमवार) नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी पुतण्याच्या सत्तेला हादरा देत सर्व सभापतीपदे आपल्या गटाला मिळविली. एमआयएम (स्वतंत्र गट), शिवसेना व भाजपची साथ मिळविण्यातही त्यांना यश आले.

नगर पालिका निवडणुकीत बीडमध्ये क्षीरसागरांच्या घरात काका - पुतण्या संघर्ष पहायला मिळाला. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या विरोधात त्यांचेच थोरले बंधू रवींद्र क्षीरसागर निवडणुक रिंगणात उतरले. मात्र, नगराध्यक्षपदी विजयी होण्यात यश मिळविलेल्या डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्यावर पुतणे संदीप क्षीरसागर यांनी सभापती निवडीत कुरघोडी केली. संदीप क्षीरसागर यांच्या आघज्ञडीने सर्वाधिक २० जागा मिळविल्या. पहिल्याच निवडणुकीत बीड पालिका निवडणुकीत एमआयएमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार दुसऱ्या स्थानावर राहीले तर पक्षाचे आठ नगरसेवक विजयी झाले. मात्र, एमआयएम मध्ये फुट पडली आणि त्यांचा फुटीर गट आपल्या बाजूने घेण्यात त्यांना यश आले. पालिकेत संदीप क्षीरसागर गटाने उपाध्यक्षपदासह सर्व सभापतीपदे मिळविली. त्यामुळे नगराध्यक्ष एका गटाचा आणि इतर सत्ता दुसऱ्या गटाकडे असे चित्र होते.

दरम्यान, आज झालेल्या सभापतीपदाच्या निवडीत डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी पुतणे संदीप क्षीरसागर यांच्यावर कुरघोडी करत एमआयएमसह शिवसेना, भाजपला गळाला लावत सर्वच विषय समित्यांवर मोहर उमटविली. विरोधी गटाचे उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांच्याकडे शिक्षण समिती देण्यात आली. विरोधी काकू - नाना आघाडीचे सर्व सर्व सदस्य गैरहजर होते. निवडी बिनविरोध झाल्या. नगराध्यक्षांना साथ देण्याच्या बदल्यात एमआयएमला तीन सभापतीपदे मिळाली.

सभापती खालील प्रमाणे
- जयश्री विधाते - महिला व बालकल्याण
- बांधकाम - शेख सादेक
- स्वच्छता - विकास जोगदंड
- पाणी पुरवठा - मुखिद लाला
- नियोजन - शेख सुलताना शेख चांद
- विद्युत - रुखिया बेगम.
- स्थाई समिती - विनोद मुळूक, जगदीश गुरखुदे

Web Title: beed news beed nagar parishad election and dr bhartkumar kshirsagar