गेवराई: बोअरवेलची गाडी पलटी होऊन दोन जण चिरडले

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 जून 2017

गेवराईहून निघालेली बोअरवेलची (क्रमांक टि. एन. 07 ई- 8087) गाडी पलटी होऊन हा अपघात झाला. गाडीमधील कामगार गाडी खाली चिरडले गेले.

गेवराई - गेवराईहून ठाकर-आडगाव येथे बोअर घेण्यासाठी जात असताना समोरून येणाऱ्या दुचाकीस्वारास वाचविताना बोअरवेल्सची गाडी पलटी होऊन झालेल्या अपघातात, गाडीवर झोपलेले मजूर चिरडले गेल्याने दोन जण ठार, तर सहा जण जखमी झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, आज (रविवार) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास गेवराईहून निघालेली बोअरवेलची (क्रमांक टि. एन. 07 ई- 8087) गाडी पलटी होऊन हा अपघात झाला. गाडीमधील कामगार गाडी खाली चिरडले गेले. या अपघातात दोन जण ठार तर सहा जखमी झाल्याची घटना जातेगांव रस्त्यावरील सोनवाडी फाट्याजवळ घडली. दरम्यान जखमीपैकी दोन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमीना बीड जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलिसांच्या मदतीने गाडी खाली चेंगरलेल्या मजुरांना बाहेर काढण्यात आले.

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा -
बीड: धानोराजवळ खासगी बसला अपघात; 9 ठार
राजू शेट्टींवर सोडलेले सदाभाऊ अस्त्र मुख्यमंत्र्यांवर बुमरॅंग झाले !​
इंग्लंडच्या विजयाने बांगलादेश उपांत्य फेरीत; ऑस्ट्रेलियाचे पॅकअप​
आले ट्रम्प यांच्या मना...
शेतकरी आंदोलनाचं आक्रीत (आदिनाथ चव्हाण)​
यादव म्हणजेच मराठे? (सदानंद मोरे)​

#स्पर्धापरीक्षा - नोटाबंदी

Web Title: beed news borewel vehicle collided 2 dead

टॅग्स