वनपरिक्षेत्र अधिकारी लाच घेताना जाळ्यात 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 जानेवारी 2018

बीड - सॉ मिल परवाना नूतनीकरण, मागील गुन्ह्यातील दोषारोपपत्र न पाठविण्यासाठी दहा हजारांची लाच स्वीकारताना वनपरिक्षेत्र अधिकारी (फिरते पथक) मानसिंग राजपूत यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. येथील बसस्थानकासमोरील एका हॉटेलमध्ये शुक्रवारी (ता. 5) दुपारी ही कारवाई झाली. गेवराई तालुक्‍यातील मादळमोही येथील एका सॉ मिलविरुद्ध गतवर्षी गुन्हा नोंद झाला होता. या प्रकरणातील दोषारोपपत्र न पाठविण्यासाठी व सॉ मिल परवान्याच्या नूतनीकरणापोटी राजपूत याने 15 हजारांची लाच मागितली होती. दरम्यान, मिलमालकाने यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

बीड - सॉ मिल परवाना नूतनीकरण, मागील गुन्ह्यातील दोषारोपपत्र न पाठविण्यासाठी दहा हजारांची लाच स्वीकारताना वनपरिक्षेत्र अधिकारी (फिरते पथक) मानसिंग राजपूत यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. येथील बसस्थानकासमोरील एका हॉटेलमध्ये शुक्रवारी (ता. 5) दुपारी ही कारवाई झाली. गेवराई तालुक्‍यातील मादळमोही येथील एका सॉ मिलविरुद्ध गतवर्षी गुन्हा नोंद झाला होता. या प्रकरणातील दोषारोपपत्र न पाठविण्यासाठी व सॉ मिल परवान्याच्या नूतनीकरणापोटी राजपूत याने 15 हजारांची लाच मागितली होती. दरम्यान, मिलमालकाने यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यावरून सापळा लावून राजपूतला दहा हजार रुपये स्वीकारताना पकडण्यात आले. 

Web Title: beed news bribe saw mill

टॅग्स