पुलाचा प्रश्‍न कायम

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 ऑक्टोबर 2017

बीड - गेल्या वर्षी बिंदुसरावरील पूल हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. वाहतुकीसाठी काही अडचण येऊ नये, यासाठी एक पर्यायी रस्ता सुरू करण्यात आला; मात्र तो रस्ता बिंदुसरा नदीला आलेल्या पुरात तीन वेळा वाहून गेला. यामुळे शहरातील नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. या पुलाची अनेक नेत्यांनी पाहणी केली. पावसाळा संपताच पुलाचे काम सुरू होईल, असे आश्‍वासनही नेत्यांनी दिले; पण पावसाळा संपला तरी काम सुरू झालेले नाही. 

धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बिंदुसरा नदीवर बार्शी नाका येथील हा पूल वाहतुकीसाठी खूप महत्त्वाचा आहे. याच पुलामुळे यंदा शहरातील नागरिकांची खूप हेळसांड झाली. या पुलाची अनेक नेत्यांनीही पाहणी केली. त्या वेळी त्यांनी येथील नागरिकांना आश्वासन दिले होते की या पुलाचे काम पाऊस बंद होताच सुरू होईल; पण पाऊस बंद होऊन पंधरा दिवस झाले तरी अजून या पुलाचे काम सुरू झाले नाही. पुलाचे काम कधी सुरू होणार, असा प्रश्‍न सर्वसामान्य नागरिक विचारू लागले आहेत. पुलाचे काम जर लवकर सुरू झाले नाही तर आगामी काळात पुन्हा ‘जैसे थे’ स्थिती राहण्याची शक्‍यता आहे. हे काम लवकरात लवकर सुरू होण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न केले पाहिजेत.

पालकमंत्री व आमदार मेटेंनी प्रयत्न करावेत
बिंदुसरावरील पूल वाहतुकीसाठी खूप महत्त्वाचा आहे. पुलाचे काम आठ महिन्यांत होणे गरजेचे आहे. या कालावधीत पुलाचे काम झाले नाही तर शहरातील नागरिकांची  पावसाळ्यात हेळसांड झाल्याशिवाय राहणार नाही. यासाठी पालकमंत्री पंकजा मुंडे व शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी विशेष लक्ष दिल्यास पुलाचे काम मार्गी लागू शकते, अशी प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करू लागले आहेत.

Web Title: beed news bridge bindusara river