आठवले टोळीवर होणार  मोक्काअंतर्गत कारवाई

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 जुलै 2017

बीड - सतत गंभीर स्वरूपाचे गुन्हे करून दहशत निर्माण करणाऱ्या शहरातील आठवले टोळीवर ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मिलिंद भारंबे यांनी यास परवानगी दिली आहे. सनी आठवले व अक्षय आठवले हे म्होरके असलेल्या या टोळीत चौघांचा समावेश आहे.

शहरातील मोंढा भागात ११ मे २०१७ रोजी राजविला हॉटेलमध्ये राजू केदार नगरे याच्यावर गावठी पिस्तूलद्वारे गोळीबार करताना अक्षय आठवले जखमी झाला होता. यावेळी नगरेला बेदम मारहाण झाली होती. या प्रकरणात अक्षय आठवले, सनी आठवले, विकी जाधव, शुभम वाघमारे यांच्यावर पेठ बीड ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. या गुन्ह्यासंदर्भात अधीक्षक जी. श्रीधर यांनी आठवले टोळीची पार्श्वभूमी तपासली होती. अक्षय व सनी हे सख्खे भाऊ असून २०१२ पासून ते गुन्हेगारी वर्तुळात आहेत. त्यांच्यावर आतापर्यंत ९ गुन्हे नोंद आहेत. पेठ बीड ठाण्यात ५, बीड शहर, शिवाजीनगर व बीड ग्रामीण ठाण्यात प्रत्येकी एक व गोंदी (जि. जालना) येथील ठाण्यातील एका गुन्ह्याचा समावेश आहे. खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, अवैध शस्त्र बाळगणे, शस्त्रांची खरेदी-विक्री करणे अशा गंभीर गुन्ह्यांत त्यांचा सहभाग रहिलेला आहे. अधीक्षक जी. श्रीधर यांनी पेठ बीड ठाण्याचे निरीक्षक अनिलकुमार जाधव यांना आठवले टोळीविरुद्ध मोक्का (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९) अन्वये कारवाईचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार १८ जून २०१७ रोजी अधीक्षक श्रीधर यांनी यासंदर्भातील प्रस्ताव विशेष पोलिस महानिरीक्षक मिलिंद भारंबे यांच्याकडे पाठविला. यास भारंबे यांनी परवानगी दिली. याचा तपास अधीक्षक श्रीधर यांनी आष्टीचे उपअधीक्षक डॉ.अभिजित पाटील यांच्याकडे सोपविला आहे. 

Web Title: beed news crime