आर्वीत दगडफेक; सहा जणांविरुद्ध गुन्हा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 मे 2018

बीड - न्यायालयात दाखल केलेला खटला मागे घे म्हणत दगडफेक केल्याचा प्रकार आर्वी (ता. शिरूर) येथे शुक्रवारी (ता. 18) सायंकाळी घडला. यामध्ये दोघेजण जखमी झाले असून सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात समोरच्या गटाकडूनही दगडफेक झाल्याने चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. परस्परविरोधी तक्रारीवरून एकूण दहा जणांविरुद्ध शनिवारी (ता. 19) रात्री शिरूर ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

शिरूर तालुक्‍यातील आर्वी येथे पाच ते सहा जणांनी प्रकाश सोनाजी फरताडे यांना कोर्टातून केस मागे घे, असे म्हणत त्यांच्या दिशेने दगडफेक केली. या दगडफेकीत प्रकाश फरताडे यांच्यासह अन्य एक जण जखमी झाले आहेत. प्रकाश फरताडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बप्पासाहेब जनार्दन घरगिने, धनंजय बप्पासाहेब घरगिने, माऊली बप्पासाहेब घरगिने, धनंजय सखाराम मळेकर, उषा बप्पासाहेब घरगिने व अन्य एक यांच्याविरुद्ध शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेडकॉन्स्टेबल गित्ते हे तपास करीत आहेत. या प्रकरणात बप्पासाहेब घरगिने यांनीही विरोधी फिर्याद दिली. पाणी भरण्याच्या कारणावरून आमच्यावर दगडफेक केल्याप्रकरणी विकास प्रकाश फरताडे, आशाबाई प्रकाश फरताडे, प्रकाश सोनाजी फरताडे, मनीषा विकास फरताडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Web Title: beed news Crime against six