चार संशयित पोलिसांच्या ताब्यात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 ऑगस्ट 2017

बीड - गेवराईतील सरस्वती कॉलनी येथे वास्तव्यास असणाऱ्या, भवानी अर्बन बॅंक व्यवस्थापकाच्या घरावर दरोडेखोरांनी धुमाकूळ घालत पती-पत्नीची डोक्‍यात कुऱ्हाड घालून क्रूर हत्या केल्याची घटना बुधवारी (ता. २३) घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले असून त्यातील दोघे सराईत गुन्हेगार आहेत.  

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या चार संशयितांपैकी दोघे गेवराई तालुक्‍यातील केकतपांगरी येथील असून त्यांच्यावर यापूर्वी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. एक संशयित हा जालना जिल्ह्यातील अंबड येथील, तर दुसरा परळी तालुक्‍यातील सिरसाळा येथील असल्याचे कळते. या चौघांनी मिळून हे कृत्य केल्याचे तपासात समोर आले. या घटनेत आरोपीपर्यंत पोचण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. त्यातच मांजरसुंबा व नेकनूर भागात एकाच रात्री नऊ दुकाने चोरट्यांनी फोडल्याने कायदा व सुव्यवस्थेचा मोठा प्रश्‍न निर्माण झाला होता. य प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखा व गेवराई पोलिसांनी जवळपास शंभराहून अधिक आरोपींची चौकशी करूनही पोलिसांच्या हाती धागेदोरे लागले नव्हते. अखेर रविवारी दुपारी स्थानिक गुन्हे शाखेने चार संशयितांना ताब्यात घेत त्यांची कसून चौकशी सुरू केली आहे.

Web Title: beed news crime police