परतीच्या पावसाने माजलगाव धरण शंभर टक्के भरले

कमलेश जाब्रस
मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017

परतीच्या झालेल्या दमदार पावसामुळे तसेच जायकवाडी धरणातुन कॅनाॅलव्दारे सुरू असलेल्या पाण्यामुळे माजलगाव धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत गेली. आज (ता. २४)  माजलगाव धरणाची पाणी पातळी ४३१.८० मिटर झाल्याने 100 टक्के भरले आहे. या धरणातुन बीड व माजलगाव शहरांसह ११ खेड्यांना पाणीपुरवठा केला जातो

माजलगाव (जि. बीड) - परतीच्या दमदार पावसामुळे माजलगाव धरण आज शंभर टक्के भरले.  त्यामुळे माजलगाव शहरासह अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला असुन रब्बी हंगामात शेतीसाठी पाणी मिळणार  आहे.  

यंदा पावसाळ्याच्या सुरूवातील जुन महिन्यात पाऊस झाला. परंतु, जुलै, आॅगस्ट दोन महिने कोरडे गेल्याने कापुस, सोयाबीन, मुग, उडीद यासह खरिप हंगामतील पिके शेतकऱ्यांच्या हातातुन गेली. उपलब्ध पाण्यावर शेतकऱ्यांनी कापुस पिक जोपासले होते.

परतीच्या झालेल्या दमदार पावसामुळे तसेच जायकवाडी धरणातुन कॅनाॅलव्दारे सुरू असलेल्या पाण्यामुळे माजलगाव धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत गेली. आज (ता. २४)  माजलगाव धरणाची पाणी पातळी ४३१.८० मिटर झाल्याने 100 टक्के भरले आहे. या धरणातुन बीड व माजलगाव शहरांसह ११ खेड्यांना पाणीपुरवठा केला जातो

Web Title: beed news: dam water agriculture