डल्लामार करणारे हल्लाबोल यात्रा कढताहेत: मुख्यमंत्री

डल्लामार करणारे हल्लाबोल यात्रा कढताहेत: मुख्यमंत्री
डल्लामार करणारे हल्लाबोल यात्रा कढताहेत: मुख्यमंत्री

बीड: शेतकऱ्यांच्या जमिनी सिंचनाखाली आणण्याऐवजी स्वतःचे सिंचन करणारे आणि पंधरा वर्षे डल्ला मारणारे आता हल्लाबोल करत असल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

यांच्या पंधरा वर्षातील कारनामे जनतेसमोर मांडून यांचाच हल्लाबोल यांच्यावर उलटवू असेही श्री. फडणवीस म्हणाले. वडवणी तालुक्यातील सोन्नाखोटा येथील उर्ध्व कुंडलिका मध्यम प्रकल्पाचे जलपूजन, जळवीतरण आणि कूपनलिका कामाचे भूमिपूजन शुक्रवारी (ता. एक) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यानंतर झालेल्या सरपंच परिषदेत ते बोलत होते. श्री फडणवीस म्हणाले, आम्ही चूक असलो तरी बेईमान नाही. कृषी विकासाचा दर १२.५० टक्के झाल्याचा दावा त्यांनी केला. उद्योगात राज्य पहिल्या क्रमांकावर आले असून देशात झालेल्या गुंतवणुकीपैकी निम्मी गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात झाल्याचे ते म्हणाले. येत्या सात महिन्यात प्रकल्पाचे काम पूर्ण करून शेतकऱ्यांना शेतात पाणी दिले जाईल असे गिरीश महाजन म्हणाले. ग्रामविकास खात्यांतर्गत राज्यात ३० हजार किलोमीटर रस्ते बांधकाम सुरू असल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या. पाईपलाईनमुळे पाण्याचा अपव्यय होणार नाही.

३०४ हेक्टर क्षेत्रावर उभारला असून नऊ गावांतील २८०० हेक्टर जमीन या प्रकल्पातून ओलिताखाली येणार आहे. १८.७७ दलघमी क्षमता असलेल्या प्रकल्पासाठी पाच गावांतील २४१ कुटुंब बाधित झाले असून रुई पिंपळा गाव विस्थापित होऊन पुनर्वसित झाले. आता १० किलोमीटर अंतर पाईपलाईन अंथरली जाणार आहे. एकूण ३१८ कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पावर आतापर्यंत २१९ कोटी रुपये खर्च झाले. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे, शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे, आमदार भीमराव धोंडे, आमदार आर टी देशमुख, लक्ष्मण पवार, संगीता ठोंबरे, भाजप नेते रमेश आडसकर विभागीय आयुक्त डॉ पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह, पोलीस अधीक्षक जी श्रीधर उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com