देवेंद्र फडणवीस यांचे सरकार फेकु सरकार : धनंजय मुंडे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 नोव्हेंबर 2017

राज्यातील फडणवीस सरकारने शेतकऱ्यांसह सर्व सामान्यांचा अपेक्षा भंग केला आहे. कर्जमाफीची फक्त जाहिरात बाजी केली प्रत्यक्षात मात्र एकाही शेतक-याच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम आलेली नाही

माजलगाव(जि. बीड), ता. १  : शेतकऱ्यांना ऐतिहासिक कर्जमाफी दिली असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत; परंतु प्रत्यक्षात मात्र कर्जमाफी झालेलीच नाही. फडणवीस सरकार हे फेकु सरकार आहे. २०१९ पूर्वी मध्यावधी लागण्याची शक्यता अाहे, असे भाकीत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले.

 तालुक्यातील पात्रुड येथे तुळजाभवानी अर्बन बँकेच्या पात्रुड शाखेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थांनी माजी मंत्री प्रकाश सोळंके होते. मुंडे म्हणाले की, राज्यातील फडणवीस सरकारने शेतकऱ्यांसह सर्व सामान्यांचा अपेक्षा भंग केला आहे. कर्जमाफीची फक्त जाहिरात बाजी केली प्रत्यक्षात मात्र एकाही शेतक-याच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम आलेली नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, जिल्हा परिषद सदस्य जयसिंह सोळंके, बालासाहेब जाधव, सुशिल सोळंके, दयानंद स्वामी, जयदत्त नरवडे, निळकंठ भोसले, दिपक जाधव, शेख मंजुर, विजय अलझेंडे, भागवत भोसले, रोहन घाडगे, चंद्रकांत शेजुळ, कल्याण आबुज, डाॅ. वसिम मनसबदार यांची उपस्थिती होती

Web Title: beed news: dhananjay munde bjp devendra fadanvis