बीडमध्ये डॉक्‍टरने केले पिंजऱ्यात पोपट कैद

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 जुलै 2017

बीड - येथील पेठबीड भागातील एका डॉक्‍टरने स्वतःच्या घरात पिंजऱ्यामध्ये दहापेक्षा जास्त पोपट कैद करून ठेवल्याचा प्रकार मंगळवारी (ता.११) समोर आला. विशेष म्हणजे पोलिस कर्मचाऱ्याकडून ही माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना कळविण्यात आल्यावर कारवाईसाठी वन विभागाचे कर्मचारी गेले खरे; परंतु ऐनवेळी डॉक्‍टरने आपल्या पंधरा ते वीस जणांना बोलावल्यावर त्यांच्या दंडेलशाहीपुढे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांवर रिकाम्या हाताने परतण्याची वेळ आली. दंडेलशाहीमुळे पिंजऱ्यात कैद पोपटांची सुटका झाली नाही; परंतु कारवाईसाठी गेलेल्या वन कर्मचाऱ्यांचा मात्र ‘पोपट’ झाला.

शहरातील पेठबीड भागातील एका डॉक्‍टरच्या घरात पिंजऱ्यामध्ये दहापेक्षा जास्त पोपट कैद असल्याचे या भागातील नागरिकांच्या लक्षात आले. त्यांनी ही माहिती एका पोलिस कर्मचाऱ्यास सांगितली. अनधिकृतरीत्या कैद केलेल्या प्राणी-पक्ष्यांच्या प्रकरणात कारवाई करणे हे पोलिसांच्या अधिकार कक्षेत येत नसल्याने त्या पोलिसाने वन विभागाच्या अधिकाऱ्यास या प्रकाराची माहिती दिली. त्यानुसार मंगळवारी (ता.११) दुपारी वन विभागाचे कर्मचारी त्या डॉक्‍टरच्या घरी जाऊन धडकले. कर्मचाऱ्यांनी घरात जाऊन झडती घेतली असता पिंजऱ्यामध्ये दहापेक्षा जास्त पोपट कैद असल्याचे कर्मचाऱ्यांना आढळून आले. याबाबत डॉक्‍टरकडे अधिक चौकशी करून कर्मचाऱ्यांनी पोपट असलेला पिंजरा घराबाहेर काढून तो आपल्या वाहनात ठेवत असतानाच डॉक्‍टरने बोलाविलेले पंधरा ते वीस जण त्या ठिकाणी आले. त्यांनी पोपटांचा पिंजरा खाली ठेवा, असा दम देताच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घाबरून पिंजरा खाली ठेवला. संबंधीत लोकांच्या दंडेलशाहीपुढे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना पोपटांची सुटका तर करता आली नाही. उलटपक्षी या भागातील नागरिकांसमोर घडलेल्या या प्रकारामुळे कारवाईसाठी आलेल्या वन कर्मचाऱ्यांचाच ‘पोपट’ झाल्याची चर्चा आहे. 

कैद पोपट ताब्यात घेण्यासाठी व कारवाईसाठी वन विभागाचे कर्मचारी पाठविण्यात आले होते; परंतु त्या ठिकाणी गर्दी जमा झाल्याने कर्मचाऱ्यांना कारवाई करणे शक्‍य झाले नसावे. या प्रकरणी सर्व माहिती घेऊन कारवाई करण्यात येईल.
-अमोल सातपुते, वन अधिकारी, बीड

Web Title: beed news doctor parrot

टॅग्स