दशक्रिया विधीसाठी गेलेल्या तरूणाचा गोदावरी नदीपात्रात बुडून मृत्यु

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 ऑक्टोबर 2017

भास्कर चौरे यांच्या बुडून मृत्यु झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या पश्‍चात एक भाऊ, आई, वडिल असा परिवार आहे

माजलगाव - नातेवाईकांच्या दशक्रिया विधीसाठी गेलेल्या भास्कर रामचंद्र चौरे (वय २३ वर्षे, राहणार गव्हाणथंडी) हा तरुण बुधवारी (ता. २४) आंघोळीसाठी गेला असता गोदावरी नदीपात्रात बुडाला होता. मृतदेह सापडत नसल्याने औरंगाबाद येथील जलतरण अतिदक्षता पथकास पाचारण करण्यात आले होते. २४ तासाच्या अथक प्रयत्नानंतर शेवटी गुरूवारी (ता. २६) दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान भास्करचा मृतदेह औरंगाबादच्या पथकाला सापडला. 

भास्कर रामचंद्र चौरे हा बुधवारी (ता.२५) नातेवाईकांच्या दशक्रिया विधीसाठी गोदावरी नदीवर गेला होता. यावेळी अंगोळ करण्यासाठी पाण्यात उतरला असता तो बुडाला. दरम्यान ग्रामस्थांनी भास्करचा पाण्यात शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतू त्याचा शोध लागेना झाल्यावर औरंगाबाद येथील जलतरण अतिदक्षता पथकास गुरुवारी (ता.२६) पाचारण करण्यात आले, या पथकाने गोदावरी नदीपात्रात शोधाशोध करून सकाळी १२ वाजण्याच्या दरम्याण बुडालेल्या भास्कर चौरे यांचा मृतदेह शोधून काढला.

भास्कर चौरे यांच्या बुडून मृत्यु झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या पश्‍चात एक भाऊ, आई, वडिल असा परिवार आहे

Web Title: beed news: drowning death