बनावट नोटा प्रकरणातील कैद्याचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 जुलै 2017

बीड - बनावट नोटा प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या एका कैद्याची प्रकृती शुक्रवारी (ता. ३०) अचानक खालावली. त्यामुळे त्यास जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा रात्री उशिरा मृत्यू झाला. सातत्याने अतिप्रमाणात मद्यप्राशन केल्यामुळे आतडी सडल्याने त्यातून झालेल्या संसर्गातून त्याचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश चव्हाण यांनी दिली. भरत लबडे (वय २७) असे मृताचे नाव आहे.

बीड येथील दरोडा प्रतिबंधक पथकाने २० जूनला आष्टी शहरातील एका झेरॉक्‍सच्या दुकानावर रात्री आठच्या सुमारास छापा टाकून बनावट नोटा छापण्याच्या संशयातून लबडे आणि शहानवाज खान (रा. लोणी व्यंकनाथ, ता. श्रीगोंदा, जि. नगर) या दोघांना अटक करून त्यांच्याकडून दोन हजार, पाचशे व शंभर रुपयांच्या २ लाख १५ हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या होत्या. त्यानंतर यातील दोन्ही आरोपींना आष्टी पोलिसांच्या ताब्यात दिले होते. न्यायालयाने बनावट नोटा प्रकरणातील आरोपी शहानवाज खान व भरत लबडे या दोघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्यांची रवानगी बीड येथील जिल्हा कारागृहात करण्यात आली होती. शुक्रवारी (ता. ३०) दुपारी लबडे (वय २७) यास अस्वस्थ वाटू लागल्याने कारागृह प्रशासनाने त्यास जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक सहामधील लॉकअपमध्ये लबडे याच्यावर उपचार सुरू असताना रात्री ११.४० वाजता त्याचा मृत्यू झाला.  

पूर्वीपासूनच होता आजारी
भरत लबडे  हा अतिमद्यप्राशन करीत असल्याने त्याच्या शरीरातील आतडे पूर्णतः सडले होते. त्याच्या लिव्हरवर सूज आली होती. पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले होते तेव्हा तो आजारी असावा. लबडे हा पूर्वीपासूनच आजारी असल्याचे तपासणीतून निष्पन्न झाले आहे. शुक्रवारी दुपारी त्यास जिल्हा रुग्णालयात आणले असता त्याचे लिव्हर खराब असल्याचे वेगवेगळ्या चाचण्यांतून समोर आले. तसेच त्याच्या काळजावर सूजही आली होती. त्यावर उपचार सुरू होते. मात्र, जंतुसंसर्ग वाढल्याने त्याचा मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश चव्हाण यांनी सांगितले. कस्टोडियल डेथ असल्याने लबडे याचे इनकॅमेरा पोस्टमॉर्टम करण्यात येणार असून, पोलिस मागणी करतील त्या ठिकाणी ते केले जाईल, असेही डॉ. चव्हाण म्हणाले.

Web Title: beed news fake currency

टॅग्स