दोन चिमुकल्यांना पित्याने जाळून मारले

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 जून 2017

माजलगाव (जि. बीड) - कौटुंबिक वाद विकोपाला गेल्याने आपल्या ताब्यात असणारी मुले पत्नीला कधीच मिळू नयेत म्हणून बापाने बलभीम (अडीच वर्षे) व वैष्णव (साडेचार वर्षे) या दोन चिमुकल्यांना जाळून मारल्याची हृदयद्रावक घटना बुधवारी रात्री टालेवाडी येथे घडली. निर्दयी बापाने घरातच गोवऱ्या रचून त्यावर मुलांना झोपवले व पेटवून दिले. त्यानंतर घराला बाहेरून कुलूप लावून पलायन केले.  टालेवाडी येथील कुंदन सुधाकर वानखेडे (वय २४) व पत्नी रेखा यांच्यात सातत्याने वाद होत असे. वर्षभरापासून पत्नी रेखा माहेरी असल्याने मुलांचा सांभाळ कुंदनच करीत होता. त्यांना तो आई- वडिलांची माया देत होता. 

Web Title: beed news Family dispute

टॅग्स