बीड जिल्हा बंदला प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 जून 2017

  • बीडमध्ये आंदोलकांना मारहाण
  • निषेध फेरी, दुध रस्त्यावर ओतले

बीड : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी विविध संघटनांनी पुकारलेल्या बंदला सोमवारी (ता. पाच) जिल्ह्यात प्रतिसाद मिळाला. ग्रामीण आणि निमशहरी भागातही बंद पाळण्यात आला. विविध ठिकाणी निषेध फेऱ्या निधल्या. तर काही ठिकाणी दुध रस्त्यावर ओतून शासनाचा निषेध करण्यात आला. बीडमध्ये घोषणाबाजी करणाऱ्यांना मारहाण करण्यात आली. 

मागच्या पाच दिवसांपासून जिल्ह्यात शेतकरी संप सुरु आहे. तर चार दिवसांपासून सात दुध संघांचे दुध संकलन आणि निर्यात बंद आहे. त्यामुळे या चार दिवसांत जिल्ह्यातून पुणे, मुंबई, औरंगाबाद व नगर आदी ठिकाणी जाणारे सहा लाख लिटर दुध जाऊ शकले नाही. दरम्यान, सोमवारी (ता. पाच) जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती. बीडमध्ये बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला.

बंदचे आवाहन करत व कर्जमाफीच्या घोषणा देणाऱ्या आंदोलकांना पोलिसांकडून मारहाण झाली. दरम्यान, कडा, सिरसदेवीसह विविध ठिकाणी रस्त्यावर दुध ओतून निषेध करण्यात आला. अंबाजोगाईत निषेध फेरी निघली. तर, तालखेड ता. माजलगाव येथे रास्ता रोको करण्यात आला. विविध ठिकाणच्या बाजारपेठा कडकडीत बंद ठेवण्यात आल्या.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -
नाशिकमध्ये वाढली शेतकरी संपाची धग

ज्येष्ठ पत्रकार प्रणव रॉय यांच्या निवासस्थानी छापे
काश्मीर: सीआरपीएफच्या कॅम्पवर हल्ला करणारे 4 दहशतवादी ठार
महाराष्ट्र 'बंद' यशस्वी करण्याचा शेतकऱ्यांचा निर्धार
#स्पर्धापरीक्षा - भारताची संपूर्ण स्वदेशी उपग्रह यंत्रणा 'नाविक'​
भारताचा पाकवर 124 धावांनी दणदणीत विजय​
'दानवेंच्या शेतकऱ्यांसंदर्भातील वक्तव्याचा तपास करा'
मॉन्सूनचे महाराष्ट्रात गुरुवारी आगमन​
मुंबईत भाज्यांच्या किमती भडकल्या

Web Title: beed news farmers strike maharashtra bandh successful