परळी आगारात लागलेल्या आगीत 45 लाखांचे नुकसान

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 ऑगस्ट 2017

बस अागारातच
दरम्यान, आगारचा वाहकांनी जमा केलेले तिकीट मशीन जळल्याने आगारातील सर्व बस सकाळ पासून थांबूनच आहेत. नवीन मशीन उपलब्ध होईपर्यंत बस सुटणार नाहीत. परिणामी प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. 

परळी : तिकीट मशीन मधील चार्जिंग किटमध्ये सपार्किंग होऊन लागलेल्या आगीत येथील बस आगारात 35 लाख रुपयांचे नुकसान झाले. 

आज (रविवार) पहाटे 1 ते 2 वाजेच्या सुमारास लागलेल्या आगीत 84 तिकीट मशीन, सात संगणक, रोख 4 हजार रुपये, व्यवहार पुस्तके आदी  साहित्य जळून खाक झाले.  आगाराच्या सर्व तिकीट मशीन जळल्याने सकाळी सुटणाऱ्या परळी आगारचा एकही बस जाऊ शकल्या नाहीत.

अधिक माहिती अशी : आगारातील सर्व बस शनिवारी आल्यानंतर वाहकांनी आपले तिकीट मशीन आणि साहित्य कार्यालयात जमा केले. मध्यरात्री एक तिकीट मशीनमधील चार्जिंग किटमध्ये सपार्किंग होऊन आग लागली. यामध्ये 85 मशीन सात संगणक, रोख रक्कम, व्यवहार पुस्तके व इतर साहित्य असे 35 लाख रुपयांचे साहित्य जळल्याचा अंदाज आहे. 

बस अागारातच
दरम्यान, आगारचा वाहकांनी जमा केलेले तिकीट मशीन जळल्याने आगारातील सर्व बस सकाळ पासून थांबूनच आहेत. नवीन मशीन उपलब्ध होईपर्यंत बस सुटणार नाहीत. परिणामी प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. 

Web Title: Beed news fire in parali bus station

टॅग्स