जन्मदाते देवाघरी गेले; आयुष्यभराचा साथीदार मिळाला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 जून 2017

बीड - एचआयव्हीसारख्या दुर्धर आजाराने दहा वर्षांपूर्वी आईवडील सोडून गेल्यानंतर दोघी बहिणींना इन्फंटचे छत्र मिळाले. याच आजाराने पीडित एकीला आयुष्यभराचा जोडीदार मिळाला. वटसावित्री पौर्णिमेच्या आदल्या दिवशीच हे रेशीमबंध जुळून आले. बुधवारी (ता. सात) नोंदणी पद्धतीने त्यांनी विवाह केला. 

तालुक्‍यातील पाली येथील इन्फंट इंडिया या एचआयव्ही बाधितांचे संगोपन करणाऱ्या संस्थेत दहा वर्षांपूर्वी दोन मुली दाखल झाल्या. त्यांच्या पालकांचे याच आजारामुळे दहा वर्षांपूर्वी निधन झाले. यांतील एक मुलगी १९ वर्षांची झाल्यानंतर संस्थेचे दत्ता बारगजे यांनी तिच्यासाठी योग्य अशा वराचा शोध सुरू केला. योगायोगाने तिच्यासाठी सुयोग्य वर त्यांना पाथर्डी (जि. नगर) भागात मिळाला. पदवीपर्यंतचे शिक्षण झालेला व १२ एकर जमीन असलेल्या २१ वर्षीय तरुणाने विवाहास होकार दिला. 

या जोडप्याचा येथील विवाह नोंदणी कार्यालयात बुधवारी दुपारी नोंदणी पद्धतीने विवाह झाला. निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागेश चव्हाण, इन्फंटचे दत्ता बारगजे, संध्या बारगजे, मनीषा तोकले, अशोक तांगडे, तत्त्वशील कांबळे यांच्यासह वरपक्षाकडील नातेवाईक व साक्षीदार या प्रसंगी हजर होते.

Web Title: beed news hiv wedding

टॅग्स