गेवराई: जयभवानी सहकारी कारखाना आमदार अमरसिंह पंडित यांच्याकडेच

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 जुलै 2017

जयभवानीच्या नुतन संचालकांनी गुरुवार, १३ जुलै रोजी कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष तथा माजीमंत्री शिवाजीराव  पंडित यांचा भव्य कृतज्ञता सत्कार केला. यावेळी माजीमंत्री शिवाजीराव  पंडित यांनी नुतन संचालकांचा सत्कार करून अभिनंदन केले.

गेवराई : जयभवानी सहकारी साखर कारखाना मर्या. शिवाजीनगर या कारखान्याची निवडणूक अखेर ही बिनविरोध पार पडली.

जयभवानी सहकारी कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आ. अमरसिंह पंडित यांच्या गटांनी भाजपाच्या सर्वच उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला होता. त्यानंतर निवडणूक अधिकारयानी भाजपाचे सर्व अर्ज अवैध ठरविले होते. त्या निर्णयाला औरंगाबाद येथील प्रादेशिक उपसंचालक साखर याठिकाणी अपील  करण्यात आले होते. तेथे ही निर्णय कायम ठेवण्यात आला.  

१२ जुलै ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख, या दिवशी २१ जागांसाठी २१ उमेदवारी अर्ज वैध ठरल्यामुळे ही निवडणुक अविरोध झाल्याचे निवडणुक निर्णय अधिकारी विकास माने जाहिर केले. या निवडणुकीत दैठण गटातून आ.अमरसिंह पंडित, भाऊसाहेब नाटकर, भास्करराव खरात जातेगाव गटातून पाटीलबा मस्के, शेषेराव बोबडे, प्रकाश जगताप सिरसदेवी गटातून जगन्नाथराव शिंदे, अप्पासाहेब गव्हाणे, श्रीराम आरगडे मादळमोही गटातून राजेंद्र वारंगे, शेख मन्सूर शेख मुनीर, पांडूरंग गाडे चकलांबा गटातून विठ्ठलराव गोर्डे, रमेशलाल जाजू, अर्जूनराव खेडकर सहकारी संस्था मतदार संघातून तुळशीदास औटी, अनुसूचित जाती जमाती प्रतिनिधी मधून शिवाजी कापसे, महिला प्रतिनिधीमधून सौ.संध्या आसाराम मराठे, सौ.शकुंतला संदीपान दातखीळ, इतर मागास प्रवर्गातून श्रीहरी लेंडाळ, विमुक्त जाती जमाती प्रवर्गातून साहेबराव पांढरे हे अविरोध निवडून आलेले आहेत.

जयभवानीच्या नुतन संचालकांनी गुरुवार, १३ जुलै रोजी कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष तथा माजीमंत्री शिवाजीराव  पंडित यांचा भव्य कृतज्ञता सत्कार केला. यावेळी माजीमंत्री शिवाजीराव  पंडित यांनी नुतन संचालकांचा सत्कार करून अभिनंदन केले. याप्रसंगी जयभवानीचे चेअरमन जयसिंह पंडित,माजी जि.प.अध्यक्ष ज्ञानोबा विडेकर गुरुजी, शिवाजीराव कदम, प्रकाशराव सुस्कार,बाजार समितीचे सभापती जगनपाटील काळे, खरेदी विक्री संघाचे सभापती डिगांबर येवले, जि.प.सदस्य फुलचंद बोरकर, उपसभापती शाम मुळे, माजी सभापती बबनराव मुळे, कुमार ढाकणे, पांडूरंग कोळेकर, माजी जि.प.सदस्य संग्राम आहेर, जालिंदर पिसाळ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी शाल-श्रीफळ, हार आणि फेटा बांधून नुतन संचालकांचा सत्कार करण्यात केला.

यावेळी कार्यक्रमास दिवाण डरफे, बंडू मोहिते, महादेव नन्नवरे, गणपत दातखीळ, रफिक सौदागर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर यांनी आभार व्यक्त केले.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा:

Web Title: Beed news Jaibhawani Sugar Factory election mla Amarsingh Pandit win