माजलगांव धरणातील पाणी नदीपात्रात सोडा; रास्ता रोको

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

माजलगाव (बीड): माजलगांव धरणातील पाणी नदीपात्रात सोडावे या मागणीसाठी राष्ट्वादी काँग्रेसच्या वतीने परभणी फाट्यावर राष्ट्रीय महामार्ग 222 वर आज (बुधवार) रास्ता रोको करण्यात आला.

गेल्यी दीड महिन्यांपासून पावसाने ओढ दिली असल्याने जनावरांकरीता पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. माजलगांव धरणातील पाणी सिंधफणा व नदीपात्रात सोडण्यात यावे याकरिता ग्रामपंचायतीचा ठराव घेऊन जिल्हा परिषदेला देण्यात आलेला आहे, असे असतांनाही माजलगांव धरणातून सिंधफणा नदीपात्रात पाणी सोडण्यात आलेले नसल्याने राष्ट्वादी काँग्रेसच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग 222 परभणी फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

मागण्यांचे निवेदन तहसिलदार एन. जी. झंपलवाड यांना देण्यात आले. या आंदोलनात बाजार समिती सभापती अशोक डक, कल्याण आबुज, दीपक जाधव, शरद चव्हाण, दयानंद स्वामी, कचरू खळगे, एकनाथ मस्के, चंद्रकांत शेजुळ, सुशिल सोळंके, सुनिल शिंदे, मनोज फरके, भगवान कदम यांचेसह अनेक कार्यकर्ते सहभागी होते. सुमारे अर्धा तास राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :

Web Title: beed news majalgaon dam water and road strike