पाच लाखांच्या खंडणीसाठी मल्टीस्टेट अध्यक्षास लावले पिस्तूल, कामावरून काढून टाकल्याचा राग

Crime News
Crime News

बीड : शहरातील एका मल्टीस्टेट अध्यक्षांचा वाहनचालक म्हणून कामावर असलेल्या एकास काढून टाकल्याच्या रागातून, मल्टीस्टेटच्या अध्यक्षास पिस्तूल लावून खंडणी मागितल्याची घटना रविवारी शनिवारी (ता. २३) उशिरा शहरात घटली. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी बँकेत धाव घेत अवघ्या पाच मिनिटांत त्याला ताब्यात घेतले.
हरिपाल सोपान नागरगोजे (४०, रा. रोहतवाडी ता.पाटोदा) असे आरोपीचे नाव आहे. हरिपाल नागरगोजे हा परभणे यांच्याकडे वाहनचालक म्हणून काम करत होता.

मात्र, तो कामात कुचराई करत असल्याने त्यास कामावरून कमी केले होते. यामुळे त्याने सोशल मीडियावर मल्टीस्टेट व परभणे यांच्याविरुध्द आक्षेपार्ह पोस्टही टाकल्या. अशातच शनिवारी सायंकाळी पाच वाजता तो पिस्तुलासह मल्टीस्टेटमध्ये घुसला. थेट परभणे यांच्या दालनात घुसून त्याने 'पाच लाख दे अन्यथा जीवे मारीन' अशी टोकाची धमकी दिली. त्यामुळे परभणे भयभीत झाले. शहर ठाण्याचे पोलिस निरीक्षक रवी सानप यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक मुस्तफा शेख, सहायक फौजदार नरेश चक्रे, पो.ना.महेश जोगदंड, अस्लम पठाण, सुदर्शन सारणीकर यांनी मल्टीस्टेटमध्ये धाव घेत नागरगोजे यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून जप्त केलेली पिस्तूल छर्ऱ्याची असल्याचे निष्पन्न झाले. परभणे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद झाला. रविवारी न्यायालयाने त्यास एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.

Edited - Ganesh Pitekar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com