बीड, नांदेड जिल्ह्यांत तीन शेतकऱ्यांची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 फेब्रुवारी 2018

बीड, नांदेड - बीड जिल्ह्यात दोन, तर नांदेड जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. आष्टी शहरातील शेतकरी सुभाष राजाराम काळे (वय 56) यांनी मंगळवारी (ता. 6) सकाळी शेतात विष घेतले. उपचारासाठी नगर येथे नेत असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. होळ (ता. केज) येथील शेतकरी आबासाहेब गोविंदराव शिंदे (44) यांनी काल रात्री उशिरा विष घेतले.

रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. शहापूर (ता. देगलूर) येथील शेतकरी मल्लू राजन्ना भुपतवार (70) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल दुपारी घडली.

Web Title: beed news marathwada news farmer suicide