रत्नाकरच्या मदतीसाठी सरसावले हात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 ऑक्टोबर 2017

बीड - महावितरणमध्ये तंत्रज्ञ असलेल्या रत्नाकर घोडकेला पाडव्याच्या दिवशी रोहित्र दुरुस्ती करताना विजेचा धक्का बसून हात गमवावा लागला. या घटनेमुळे मजूर कुटुंबाच्या आयुष्याचा आधार असलेल्या रत्नाकरचेच आयुष्य अंधकारमय झाले आहे. पण, माणुसकी आणखी जिवंत असल्याचे त्याला मदतीचा हात पुढे करणाऱ्यांनी दाखवून दिले. 

विडा (ता. केज) येथील ग्रामस्थांनी वर्गणी करून रत्नाकर घोडकेच्या उपचारासाठी सव्वा लाख रुपयांची मदत केली. तर, महावितरणमध्ये परळी शहरात विद्युत सहायक असलेल्या श्रीराम मुंडे यांनी ऑक्‍टोबर महिन्याचे वेतन देऊ केले आहे. 

घोडके कुटुंब भूमिहीन आहे. त्यांचा एकुलता एक मुलगा नोकरीला लागला. पण, अपघातात त्याला हात गमवावा लागला आहे. ‘सकाळ’ने रत्नाकरच्या अपघातासंदर्भात पार्श्‍वभूमी समोर आणल्यानंतर विडेकरांनी वर्गणी करून सव्वा लाख रुपये जमा करून दिले. तर, आपल्या विभागातील कर्मचाऱ्यावर अशी दुर्दैवी वेळ आल्याने मदत म्हणून श्रीराम मुंडे या विद्युत सहायकाने ऑक्‍टोबर महिन्याचे वेतन रत्नाकरला द्यावे, असे पत्र अंबाजोगाई विभागाचे कार्यकारी अभियंता मंदार वग्यानी यांना दिले. 

दरम्यान, महावितरणच्या लातूर मंडळाचे मुख्य अभियंता राजाराम बुरूड व बीड परिमंडळाचे अधीक्षक अभियंता अजिनाथ सोनवणे यांनी रत्नाकर घोडके अपघात प्रकरणात लक्ष घालून तातडीची दीड लाख रुपयांची वैद्यकीय उपचार मदत, तीन लाख रुपयांचा विमा प्रस्ताव तातडीने मंजूर केला. तसेच, आणखी तीन लाख रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव व्यवस्थापकीय संचालकांकडे मंजुरीसाठी धाडला. मात्र, औद्योगिक संबंध विभागाची दिरंगाई सुरूच आहे.

Web Title: beed news MSEB