चुकीची मीटर रीडिंग नोंदवणाऱ्या एजन्सीवर गुन्हा नोंदवा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 जून 2017

बीड - जिल्ह्यात वीजचोरी आणि थकबाकीचे प्रमाण वाढत आहे. त्यातच मीटर रीडिंग घेण्याचे काम असलेल्या एजन्सीकडून चुकीचे रीडिंग नोंदवल्याचे प्रकार समोर आले आहेत. या एजन्सीवर आणि वीजचोरांवर गुन्हे नोंदवा, अशा सूचना सहव्यवस्थापकीय संचालक आमप्रकाश बकोरिया यांनी केल्या. जिल्ह्यात ११०० कोटी रुपयांची थकबाकी आहे. 

मंगळवारी (ता. १३) महावितरणच्या बीड मंडळाची आढावा बैठक ओमप्रकाश बकोरिया यांनी घेतली. लातूर परिमंडलाचे मुख्य अभियंता राजाराम बुरुड, पायाभूत आराखडा विभागाचे अधीक्षक अभियंता डी. डी. हामंद, अधीक्षक अभियंता अजिनाथ सोनवणे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. 

नियमितपणे थकबाकी असणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करावा, वीज मीटर रीडर एजन्सीवर नियंत्रण ठेवावे, असेही श्री. बकोरिया म्हणाले. चुकीचे रीडिंग होत असेल तर एजन्सीवरही गुन्हे दाखल करुन त्यांना काळ्या यादीत टाकावे, वीज चोरी प्रकरणात चोरांविरुध्द पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात यावेत. मॉन्सूनपूर्व यंत्रणा दुरुस्तीची कामे तत्काळ करा, अशा सूचनाही त्यांनी केल्या. 

Web Title: beed news mseb meter reading

टॅग्स