आषाढी वारीतून महामंडळाला ६५ लाखांचे उत्पन्न

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 जुलै 2017

बीड - पंढरपूरला आषाढी यात्रेच्या निमित्ताने दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या वाढत्या गर्दीमुळे राज्य परिवहन महामंडळाला जिल्ह्यात चांगले उत्पन्न मिळाले. यंदा जिल्ह्यातील विविध विभागांनी पंढरपूर यात्रेसाठी स्वतंत्र जादा बसची सोय केली होती. यातून ६४ लाख ५५ हजार रुपयांचे उत्पन्न झाले असून मागच्या वर्षीच्या तुलनेत २० लाखांची वाढ झाली आहे. 

आषाढी वारीनिमित्त पंढरपूरसाठी जिल्ह्यातून ३० जून ते १० जुलै या कालावधीत १३९ जादा बस सोडल्या होत्या. प्रवाशांची गर्दी पाहता दरवर्षीप्रमाणे यंदाही बसस्थानकांमध्ये पंढरपूर यात्रेकरूंसाठी स्वतंत्र शेड उभारण्यात आले होते. यात्रा कालावधीत १३८ बसने ९७२ फेऱ्या केल्या. याचे एकूण अंतर दोन लाख ३५ हजार किलोमीटर आहे. त्याबदल्यात जिल्ह्यातील विविध विभागांना मिळून ६४ लाख ५५ हजार ७९९ रुपये उत्पन्न मिळाले आहे. दहा दिवसांच्या कालावधीत ६९ हजार ५२७ भाविकांनी प्रवास केल्याची नोंद महामंडळाकडे झाली आहे. 

Web Title: beed news MSRTC st bus