राष्ट्रवादी काँग्रेसचे बीडमध्ये 'टिमकी बजाओ'

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 नोव्हेंबर 2017

बीड : शेतकरी, निराधारांच्या प्रश्नावर आज (शुक्रवार) राष्ट्रवादी काँग्रेसने बीडमध्ये 'टिमकी बजाओ' आंदोलन केले.

निराधार योजनेतील लाभार्थींचे मानधन मिळावे, दारिद्य्र रेषेखालील सर्व्हे करावा, गॅस आणि पेट्रोलचे दर कमी करावेत, कर्जमाफ झालेल्या शेतकऱ्यांची यादी जाहिर करावी, आदी विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलकांनी छोटे डफडे (टिमकी) वाजविले. उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर, सभापती फारुख पटेल, सभापती अमर नाईकवाडे, गंगाधर घुमरे, बबन गवते, दिलीप भोसले, शिवाजी जाधव यांच्यासह महिलांचा सहभाग होता. यावेळी शासन विरोधी घोषणाबाजीही करण्यात आली.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: beed news ncp timki bajawo campaign in beed