esakal | अनोखा विवाह! मंगलाष्टकांऐवजी वधूवरांनी 'वंदे मातरम'चे गायन करत एकमेकांना घातले हार, धनंजय मुंडे गेले भारावून
sakal

बोलून बातमी शोधा

Beed News

आयुष्यात अनेक विवाह सोहळे आपण पाहिले, सामुदायिक विवाह सोहळे आयोजित केले. परंतु या सोहळ्यास उपस्थिती हे भाग्यच असल्याचे श्री.मुंडे म्हणाले.

अनोखा विवाह! मंगलाष्टकांऐवजी वधूवरांनी 'वंदे मातरम'चे गायन करत एकमेकांना घातले हार, धनंजय मुंडे गेले भारावून

sakal_logo
By
टीम ई सकाळ

बीड : एचआयव्हीसोबत जगणाऱ्या दोन जोडप्यांचा अनोखा विवाह सोहळा मंगळवारी (ता.२३) परिसरातील पाली येथील इन्फंट इंडिया संस्थेत पार पडला. सामाजिक न्याय तथा पालकमंत्री धनंजय मुंडे यांनीही या सोहळ्याला हजेरी लावली. धार्मिक विधीऐवजी वधूवरांनी एकमेकांना हार घालत वंदे मातरम या गीताचे गायन केले. आयुष्यात अनेक विवाह सोहळे आपण पाहिले, सामुदायिक विवाह सोहळे आयोजित केले. परंतु या सोहळ्यास उपस्थिती हे भाग्यच असल्याचे श्री.मुंडे म्हणाले.

वाचा - रागाच्या भरात घरातून गेलेला तरुण ज्या अवस्थेत सापडला त्याने सर्वांनाच बसला धक्का, सर्वत्रच व्यक्त होतेय हळहळ

इन्फंट इंडिया संस्थेतील दोन अनाथ एचआयव्हीसोबत जगणाऱ्या मुलींसाठी संचालक दत्ता बारगजे यांनी असेच दोन वर शोधले. त्यांचा विवाह सोहळा आणि एचआयव्ही बाधित दाम्पत्याच्या पूर्णपणे सक्षम असलेल्या चिमुकलीचा पहिला वाढदिवसही असे दोन कार्यक्रम एकत्रित पार पडले. इन्फंट व राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्याच्या सिमेंट काँक्रीटीकरणासाठी जिल्हा नियोजन समितीतून ५० लाख रुपये मंजूर केले असून, पावसाळ्यापूर्वी रस्त्याचे काम करण्यात येईल असेही धनंजय मुंडे यांनी सांगितले.

वाचा - रात्री फिरणे दूरच, रस्त्यावर थांबताही येणार नाही! औरंगाबादेत आठ मार्चपर्यंत रात्रीची संचारबंदी

तसेच, नाथ प्रतिष्ठान मार्फत दरवर्षी इन्फंटला पाच लाख रुपयांची देणगी देण्याचेही त्यांनी जाहीर केले. यावेळी श्री. बारगजे, संध्या बारगजे, परळी पालिकेचे गटनेते वाल्मीक कराड, जिल्हा समाज कल्याण सहायक आयुक्त डॉ.सचिन मडावी, सूर्यभान मुंडे, निलेश लोहिया, अविनाश नाईकवाडे, प्रा. निलेश आघाव, शिवलिंग मोराळे, तत्वशील कांबळे आदींची उपस्थिती होती.

संपादन - गणेश पिटेकर