खड्ड्यांचे माहेरघर, बीड शहर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 सप्टेंबर 2017

बीड -  शहरात खड्डे नसलेला रस्ता सापडणे मोठे कठीणच आहे. विशेष म्हणजे दोन वर्षांपूर्वी तयार केलेल्या रस्त्यांवरही जागोजागी खड्डे पडल्याने रस्ते किती दर्जेदार बनविले, याची कल्पना येईल. त्यामुळे दुचाकीस्वारांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.  

खड्ड्यांमुळे शहरातील रस्त्यांची चाळण झाली आहे. त्यामुळे ‘खड्ड्यांचे माहेरघर, बीड शहर’ असे म्हटले तर वावगे ठरू नये. थोडाही पाऊस झाला तरी शहरातील रस्ते चिखलमय होतात. शाळकरी मुले, वृद्ध, नोकरदार, वाहनधारकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पालिकेचे कारभारी केवळ आरोप-प्रत्यारोपांत आणि श्रेयवादात मग्न असल्याने खड्ड्यांतून वाट काढताना बीडकरांचे मनके ढिले झाले आहेत. शहरातील खड्ड्यांचे कमी की काय, त्यात शहरातून जाणाऱ्या धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गालाही कोणी वाली राहिला नाही. जालना रोडपासून बार्शी नाक्‍यापर्यंत विविध ठिकाणी खड्डे पडले आहेत.

Web Title: beed news Potholes