पोहनेरमधील कामांची खासदार मुंडेंकडून पाहणी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 जुलै 2017

सिरसाळा - सांसद आदर्श गाव पोहनेर येथील विकासकामांची बुधवारी (ता. १२) खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी पाहणी केली. 

डॉ. मुंडे यांनी सांसद आदर्श गावासाठी निवडलेल्या पोहनेर येथे शाळा, दवाखाना इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या कामांची त्यांनी पाहणी केली. तसेच पशुवैद्यकीय दवाखाना, प्राथमिक आरोग्य केंद्र व जिल्हा परिषद शाळा परिसरात त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. शाळेत त्यांनी विद्यार्थिनींच्या हस्ते झाडे लावून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कामांची पाहणी करून कामे दर्जेदार करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. 

या वेळी भाजप तालुकाध्यक्ष शिवाजी गुट्टे, वैद्यनाथ कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेवराव अघाव, संचालक श्रीहरी मुंडे, आश्रुबा काळे, किसन शिनगारे, वैद्यनाथ बॅंकेचे संचालक रमेश कराड, रामेश्‍वर मुंडे, भीमराव मुंडे, सुधाकर पौळ, मुन्ना काळे, बळीराम गडदे, वसंत राठोड, वसंत चव्हाण, हनुमंत नागरगोजे आदींसह कार्यकर्ते सोबत होते.

Web Title: beed news pritam mundhe